उपवनसंरक्षकाना तातडीने निलंबित करा

जनदूत टिम    26-Mar-2021
Total Views |

  • प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्याकडे पत्राव्दारे मागणी

मुंबई : वन अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या उपवनसंरक्षकाना तातडीने निलंबित करा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून निलंबित करा आणि आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी मार्फत गुन्ह्याचा तपास करा. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
 
Prvin Darekar_1 &nbs
 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन क्षेत्रात कार्यरत दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण यांची हत्या झाली असल्याचाही संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असल्यामुळे या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल शासनानेघ्यायला हवी.
 
या प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही. महाराष्ट्रात घडलेल्या इतर प्रकरणा साऱखं या प्रकरणातही महत्त्वाचे साक्षी, पुरावे नष्ट केली जाण्याची दाट शक्यता आहे, असा आरोप दरेकरांनी आपल्या पत्राव्दारे केला आहे.
 
या प्रकरणी (१) अटक करण्यात आलेल्या उपवनसंरक्षक यांना तातडीने सेवेतून निलंबित करावे, (२) संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे व (3) या प्रकरणात आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.