गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

जनदूत टिम    25-Mar-2021
Total Views |
मुंबई :  'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. कित्येक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावेळी हा सन्मान गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. जगभरातील चाहत्यांनी या पुरस्कारासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

bhosle0025_1  H 
 
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केलं.