मुस्लीम प्रर्थानास्थळाच्या बेकायदेशीर बांधकामास स्थानिक रहिवाशांचा प्रचंड विरोध

जनदूत टिम    24-Mar-2021
Total Views |
शहापूर : शहापूर शहरालगत आग्रा रोडवर, वनविभागाच्या कार्यालयासमोर टेकडीवर, आसनगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेला, हजरत सय्यद शहदाद शाह बाबा दर्ग्याच्या टेकडीचा मातीचा भराव काढण्याचे काम, गेल्या पाच सहा दिवसांपासून अतिशय वेगाने सुरु असून, त्या ठिकाणी मुस्लीम प्रार्थना स्थळ व पुढील भागात धार्मिक प्रसारासाठी व्यावसायिक इमारत बांधकाम बांधण्यात येणार असल्याचे समजल्यावरून, स्थानिक रहिवाशी नागरिकांनी या विरोधात आवाज उठवून, तहसीलदार शहापूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर यांच्याकडे सदर बेकायदेशीर बांधकाम तत्काळ थांबिविण्याची मागणी केलेली आहे.
 
darga0025_1  H
 
सदर टेकडीवर सुमारे अडीचशे वर्षांपासून जुने असलेले वडाचे झाड आहे. सदर झाडालगत नवनाथांचे पुरातन स्थान व मारुतीचे स्थान होते, त्यालगत बऱ्याच वर्षांपूर्वी तेथे सय्यद शहदाद शाह बाबाच्या दर्ग्याचे सुमारे दहा बाय दहा च्या जागेत कच्चे बांधकाम करण्यात आले होते. सदर दर्ग्यावर स्थानिक हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्मियांचा राबता होत होता. त्यानंतर काही वर्षांपासून अब्दुल्ला अब्बास कादरी या मुस्लीम व्यक्तीने आपले बस्तान तेथे बसवायला सुरुवात केली. त्यानंतर या व्यक्तीने सन २००५ च्या सुमारास अनधिकृत बांधकाम उभारण्यास सुरुवात केली. त्याचवेळेस तेथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दाखल करूनही त्याचा उपयोग झाला नाही, आसनगाव ग्रामपंचायतीने सन २००७ मध्ये सदर अनधिकृत बांधकाम तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन तहसीलदार यांनी देखील सदर बेकायदेशीर बांधकाम अनधिकृत असून काढण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही.
 
त्यानंतर सदर मुजावर अब्दुल्ला अन्ब्बास कादरी याने आपले प्रस्थ वाढविण्यास सुरुवात करून, तेथे तंत्र , मंत्र उपचार याचा दरबार सुरु केला, आजही दर गुरुवारी सदर दरबार भरत असून, नागरिकांचा ओढा सुरु असतो. त्याचवेळेस कादरी याने, टेकडीच्या परिसरातील भागावर कब्जा करून, त्या लगत अनधिकृत मशीद उभारून नमाज पढायला सुरुवात केली. या मशिदीमुळे त्या परिसरात अनेक व्यक्ती बाहेरून येण्याचे प्रमाण वाढल्याने, स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास होण्यास सुरुवात झाली. या सर्व प्रकारास स्थानिक व परिसरातील मुस्लीम बांधवांनी शासनाकडे तक्रारी दाखल करून, दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नास, चौकशीच्या व्यतिरिक्त फारसे यश हाती आले नाही. याचाच फायद घेत कादरी याने आपले प्रस्थ दिवसेंदिवस वाढत ठेवले, त्यामुळे दर गुरुवारी अनेक लोक बाहेरू येऊन, गर्दी करू लागल्यामूळे, स्थानिक रहिवाशी नागरिकांना याच प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर भाग हा मुख्य रस्त्यालगत असल्याने, या गर्दीमुळे व त्यांच्या वाहनांमुळे त्या भागात गुरुवारी नामाजादरम्याण दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली.
 
कादरी व त्याने उभारलेल्या अनधिकृत प्रार्थना स्थळ व दर्ग्यावर , काहीच कारवाई होत नसल्याने, याचा फायदा घेऊन, कादरी याने काही दिवसांपासून, मशिदीच्या बांधकामाचा विस्तार करण्यासाठी, तेथील पुरातन वडाचे झाडाचा थोडा थोडा भाग हा , कट रचून रोज जाळायला सुरुवात केली व एके दिवशी वीज पडल्याचे ढोंग करून, वडाचे झाड पेटवून त्याच काही भाग काढून टाकला, अन गेल्या पाच सहा दिवसांपासून, अनधिकृत रित्या टेकडीचा भाग अतिशय वेगाने काढून टाकायला सुरुवात केली. त्या भागातून सुमारे दीडशे ट्रक च्या वर माती काढून परस्पर लंपास केल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी याची अधिक माहिती घेतली असता त्या ठिकाणी भव्य प्रार्थना स्थळ उभारण्याचा हेतू असल्याचे नागरिकांच्या लक्षांत आल्याने, स्थानिक नागरिक, कमलेश कुंदर, पी.बी.भोईर, राजेश खंबायत, भगवान तांदळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मा.तहसीलदार साहेब, शहापूर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर यांची भेट घेऊन, या संदर्भात्त निवेदन देऊन सदर बेकायदेशीर बांधकाम तत्काळ थांबविण्याची मागणी केलेली आहे, व अनधिकृतरित्या मुस्लीम प्रार्थना स्थळ उभारण्यास विरोध केला आहे.
 
सदर ठिकाणी बांधण्यात येणारा भाग हा, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये येत असून, बांधकामास शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेतलेली नाही. तसेच या पारंपारिक नवनाथांच्या स्थळावर, अनधिकृत मशीद बांधून अतिक्रमण झाल्यास, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.