डी.जी.टी.महाविद्यालयाच्यावतीने COVID19 महामारीवर पोस्टर प्रदर्शन

नरेश पाटील    22-Mar-2021
Total Views |
माणगांव : माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे महाविदयालय माणगांव रायगड येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दिनांक २०/०३/२०२१रोजी पोस्टर प्रदर्शनाचे माणगांव बसस्थानक येथे आयोजन करण्यांत आले होते. संस्थेचे अध्यक्ष, मा. अॅड. राजीवजी साबळे साहेब, महाविदयालयाचे प्राचार्य, डॉ. बी.एम. खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपकमाचे आयोजन करण्यांत आले होते.
 
mangaon44_1  H
 
COVID19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी महाविदयालयाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी लोकांनी काळजी घ्यावी. या उद्देशाने भित्तीपत्रकाचे प्रदर्शन माणगांव बसस्थानक येथे मांडण्यात आले. या कार्यक्रमास संदेश देताना मा. अॅड. राजीवजी साबळे साहेबांनी सूचविले की, COVID19चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रथम मास्कचा वापर करावा, आपले हात साबणाने स्वच्छ करावेत अथवा सॅनिटायझरचा वेळोवेळी उपयोग करण्यात यावा आणि सामाजिक अंतर ठेवण्यात यावे. नागरीकांनी आपापली काळजी घ्यावी असेही संदेश दिले.
 
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माणगांव एस.टी. आगार प्रमुख चेतन मुकुंद देवधर यांनी विशेष सहकार्य केले. त्याचप्रमाणे सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.एल.एल.ई विभाग प्रमुख प्रा. पांडेय जे. आर., प्रा. अमरीन आडकर, प्रा. आदिल बडे, प्रा. भानुप्रसाद विश्वकर्मा, प्रा. तमसील शाहजहान, प्रा. सबरीन लोखंडे आणि प्रा. फिर्दोस जाफर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.