पंचायत समिती कल्याणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेशाला केराची टोपली !

जनदूत टिम    21-Mar-2021
Total Views |

ग्रामपंचायत गुरवलीचे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांचा मनमानी कारभार!

कल्याण : पंचायत समिती कल्याण अंतर्गत गुरवली गावात होत असलेल्या गैरकारभार बाबत २०१७ पासून अनेक तक्रारी गुरवली गावातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकारी अरुण देशमुख यांनी पंचायत समिती कल्याण ते मंत्रालय कडे केलेल्या आहेत. तसेच माहिती न मिळाल्यामुळे अनेक प्रथम अपील पंचायत समिती कल्याण कार्यालयात केलेल्या आहेत.
 
guravli0254_1  
 
त्याअनुषंगाने पंचायत समिती कल्याण कार्यालयात दि. ०४/०३/२०२१ रोजी झालेल्या प्रथम अपील सुनावणी ही प्रथम अपील अधिकारी यांनी त्यांच्या दालनात घेण्यात आल्या. अपील सुनावणी दरम्यान जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांनी अपिलार्थी अरुण देशमुख यांना माहिती दिली नाही. याची खात्री अपिलीय अधिकारी यांना झाली.
तत्पूर्वी अपिलार्थी अरुण देशमुख यांनी पंचायत समितीचे अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांना अपिलात लेखी दिलेले आहे की, मागितलेल्या माहितीत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समजते.
 
अपिलार्थी अरुण देशमुख यांनी ग्रामपंचायत गुरवलीची मागितलेली माहिती पुढील प्रमाणे:-
१) ग्रामपंचायत गुरवलीच्या गाळ्याबाबत माहिती
२) ग्रामपंचायत गुरवली जलस्वराज्य प्रकल्प पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या बँक खातेबाबत माहिती
३) ग्रामपंचायत गुरवलीने बांधकाम परवानगीसाठी दिलेल्या नाहरकत बाबत माहिती
वरील सर्व विषयांची माहिती ही ग्रामपंचायत गुरवलीचे जनमाहिती अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांनी न दिल्याने अपिलार्थीने प्रथम अपील केली. दिनांक ०४/०३/२०२१ रोजी पंचायत समिती कल्याण कार्यालयात प्रथम अपील सुनावणी झाली. प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांनी पुढील आदेश दिले.
१) माहिती अधिकारी यांनी वेळेत माहिती दिली नाही व लेखी कळविले नाही म्हणून नियम ७(६) खाली मागवलेली माहिती मोफत द्यावी.
२) मागवलेली माहिती अपिलार्थी यांचे संमतीने १५ दिवसात द्यावी.
पंचायत समितीचे अपिलीय अधिकाऱ्याने आदेह पारित करून तात्काळ सुनावणी नंतर अपिलार्थी अरुण देशमुख आणि जनमाहिती अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांना देण्यात आले.
 
परंतु ग्रामपंचायत गुरवलीचे मुजोर/मनमानी कारभार करणारे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांनी अपिलार्थीस १५ दिवसात कोणतीही माहिती दिली नाही आणि कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. ग्रामपंचायत गुरवलीचे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांनी प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान व अवहेलना करून प्रथम अपिलीय अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम जनमाहिती अधिकाऱ्याने केलेले आहे.
 
ग्रामपंचायत गुरवलीचे जनमाहिती अधिकारी अर्जुन जी. इंगोले यांना माहिती अधिकार कायदा २००५ चा धाक राहिलेला नाही. माहिती अधिकार कायदा व वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान व अवहेलना केली आहे. यावर पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात. याकडे संपूर्ण परिसरातील लोकांमध्ये चर्चा जोर धरत आहे.