ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनाई आदेश

19 Mar 2021 13:51:38
ठाणे : ठाणे ग्रामीण जिल्हयामध्ये दि. २८ मार्च २०२१ रोजी होळी, दि. २९ मार्च २०२१ रोजी धुलीवंदन व दि. ०२ एप्रिल२०२१ रोजी रंगपंचमी हे सण साजरे होणार आहेत. होळी पेटविण्यासाठी मोठया प्रमाणात लाकुड वापरले जाते. तसेच धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग, पाणी, चिखल मिश्रीत पाणी उडवतात. त्या अनुषंगाने असे समजते की, नमुद सण - उत्सवांच्या कालावधीत ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये खालील नमुद घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
holi-1-n_201903210003_1&n
 
सार्वजनिक ठिकाणावरील झाडे,लाकडे तोडणे, जाळणे,दहन करणे.पादचाऱ्यावर रंगित पाणी, रंग किंवा पावडर फेकणे अथवा उडविण्याचा प्रयत्न करणे. आरोग्यास अपायकारक होईल अशा रासायनिक रंगांचा वापर करणे. रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे अथवा इतर द्रव पदार्थाचे फुगे अथवा प्लांस्टीकच्या पिशव्यांचा वापर करून फेकल्यामुळे आरोग्यास अपाय व जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे.सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, घोषणा देणे, अश्लील गाणी गाणे. सार्वजनिक जागेत विकृत हावभाव करणे किंवा वाकुल्या व विडंबनचे प्रदर्शन करणे/भरविणे किंवा चित्रेप्रतिकृती अथवा कोणत्याही वस्तुचे अथवा उद्देशाचे की, ज्यामुळे एखादयाची प्रतिष्ठा, योग्यता व नैतिकतेला धक्का पोहचेल.
 
लोकांना कोणताही त्रास, अडथळा, दुखापत जिवितास/आरोग्यास धोका अथवा शांततेस बाधा अथवा दंगा, मारामारी होऊ नये व त्यास प्रतिबंध व्हावा. साजरे होणारे नमुद सण - उत्सव शांतते पार पाडावेत, जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने ठाणे जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वरील कृत्यास मनाई करणेत येत आहे.
हा मनाई आदेश ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि.२२ मार्च २०२१ रोजीचे ००.०० ते दि. ०५ एप्रिल २०२१ रोजीचे २४.०० वाजे पर्यंत अंमलात राहील.असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0