पाली/गोमाशी : पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवारी (ता.14) कर्जत येथील वरणे गावात संपन्न झाली. या स्पर्धेत 75 ते 80 वजनी गटात पालीतील अनुज सरनाईक याने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे त्याची 24 ते 26 मार्चला श्रीनगर येथे होणाऱ्या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनतर्फे घेण्यात आली होती. लॉकडाउन नंतरची पहिलीच स्पर्धा आणि 2021 मधील पहिले सुवर्ण पदक मिळाल्याने खूप आनंद होत आहे. असे अनुज सरनाईक याने दै जनदूतला सांगितले. अनुजच्या या यशाने रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अनुजचे गुरू भारतीय पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनचे सचिव किशोर प्रकाश येवले यांनी देखील अनुजचे अभिनंदन केले आहे.