जस’ को ‘प्रीत’ मिल गयी

जनदूत टिम    15-Mar-2021
Total Views |
जसप्रीत बुमराह अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासोबत त्यानं सोमवारी लग्नगाठ बांधली. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या. यानंतर अमूलनं जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या.
 
jasprit-bumrah-sanjana-ga
 
अमूलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि संजना या दोघांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. तसंच यासोबत अमूलनं जस को प्रीत मिल गयी असा सुंदर संदेश लिहित त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. जसप्रीतनं सोशल मीडियावर काही आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. “प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे, असं जसप्रीत बुमराहनं लिहिलं.
 
संजना गणेशन ही स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचं अँकरींग केले आहे. तिनं २०१९ च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Tech चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर २-१३-१४ मध्ये तिनं सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.