वस्तीगृह उभारण्याची गरज - आमदार रमेश दादा पाटील

08 Feb 2021 16:33:50
दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी दिंडोरी नाशिक येथे कोळी महासंघाचे राष्‍ट्रीय आमदार रमेश दादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीवर निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मेळावा घेतला यावेळी आमदार रमेश दादा पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील आधी जनता वस्तीगृह हे सध्या बंद पडले असेल ते नव्याने सुरु करणे गरजेचे असून ते सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील जेणेकरून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळून हा समाज साक्षर बनेल असे सांगितले.
 
KOLI0256_1  H x
 
आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा समाजाला लाभ घेता यावा म्हणून मार्गदर्शन केले जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधव नाशिक जिल्ह्याच्या विकासापासून वंचित राहायला आहे त्यांना रोजगाराच्या समस्या भेडसावत असून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तपासणी समिती दोन-तीन वर्ष विलंब करीत असल्याने आदिवासी बांधव शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहत असून ही बाब गंभीर असल्याची भावना कोळी बांधवांनी व्यक्त केली.
 
आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चालीरीती जपण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून स्वयंरोजगाराकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे कोळी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ञान बनवून आपल्या समाज बांधवांना जास्तीत जास्त मदत करण्याचे ध्येय गाठावे असे आव्हान आमदार रमेश दादा पाटील यांनी केले आदिवासी मच्छिमार संस्थांना संरक्षित वनपट्टे आणि गाळपेरा जमीन सातबारा आदिवासी जमातीच्या बांधवांच्या नावावर करावे आदिवासी जमीन हडप करण्याचे वाढत प्रकार अशा निरनिराळ्या समस्यावर यावेळी चर्चा करून या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आमदार रमेश दादा पाटील यांनी सांगितले
 
या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष माननीय गुलाबराव गांगुर्डे यांनी केले होते याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके कोळी, महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, शिव शंकर फुले, शिव चित्रकार प्रा.भाऊसाहेब नेहरे आणि पीठे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0