उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने ऋषीगंगा विद्युत प्रकल्प उद्‌ध्वस्त

जनदूत टिम    07-Feb-2021
Total Views |

  • १५० जण गायब असल्याची भीती!

चमोली (उत्तराखंड) जोशीमठ येथे हिमकडा (ग्लेशिअर) तुटल्याने महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. ऋषीगंगा वीज प्रकल्पही नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
himkada_1  H x
 
हिमकडा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार व इतर ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रहाट यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले की, चमोलीच्या रिनी गावात ऋषीगंगा प्रकल्पाचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. नदीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने खालील भागात (अलकनंदा परिसर) पूर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात लोकांना सतर्क केले गेले आहे.
 
नदीकाठच्या भागातून नागरिकांना सुरक्षितस्थळी रवाना केले जात आहे. मी सर्वांना विनंती करतो की कोणताही जुना व्हिडिओ शेअर करुन घाबरू नका. परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली आहेत आपण संयम ठेवला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.