कोल्हापूर - दिल्ली हवाई सेवा ही लवकरच सुरू होणार

जनदूत टिम    07-Feb-2021
Total Views |
कोल्हापूर : दिर्घकाळापासुन प्रलंबित असलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू होण्यातील सर्व तांत्रिक अडचणी दुर झाल्या असुन येत्या २२ फेब्रुवारी पासुन इंडिगो तर्फे ही सेवा सुरू होत असल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री चे हवाई वाहतुक समितिचे चेअरमन ललित गांधी यांनी दिली.
 
kolha98745232_1 &nbs
 
कोल्हापूर विमानतळाच्या विकासासह नवीन मार्गांचा समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती. विशेषतः कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर-दिल्ली सेवेसाठी अनेकांचा विशेष आग्रह होता. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळावरून नवीन सेवांच्या प्रश्‍नांसह नियमित विमानसेवांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करणेसाठी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री नाम. हरदिपसिंह पुरी यांनी विशेष बैठकीसाठी २० जानेवारी २०२० रोजी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या हवाई वाहतुक समिति ला निमंत्रित
केले होते.
 
याबैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन महत्वपुर्ण निर्णय झाले, त्यामध्ये नाम. हरदीपसिंह पुरी यांनी कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर-दिल्ली या दोन नवीन मार्गावर सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. मान्यतेनंतर प्रत्यक्ष हवाई सेवा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोना महामारीच्या संकटामुळे देशातील हवाई सेवाच काही काळ बंद राहीली व हे नवीन मार्ग ही प्रलंबित राहीले.
 
विमान वाहतुक सेवा पुर्ववत सुरू झाल्यानंतर ‘महाराष्ट्र चेंबरने’ पुन्हा पाठपुरावा सुरू केला होता. सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर अहमदाबाद विमानतळाच्या मंजुरीसाठी काम प्रलंबित राहीले. ही सेवा सुरू करण्यास मान्यता मिळालेल्या ‘इंडिगो’ च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना या अडचणी दुर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची लेखी विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर या सर्व अडचणी दुर होऊन आता प्रत्यक्ष हवाई सेवा सुरू होत आहे ही अत्यंत आनंदाची व कोल्हापूरच्या विकासासाठी महत्वपुर्ण घटना असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
 
यासर्व प्रक्रीयेमध्ये खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ॠतुराज पाटील, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया या सर्वांचे व विशेषतः एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंह यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहीती देऊन ललित गांधी यांनी आता कोल्हापूर-दिल्ली सह अन्य मार्गांवरही नवी सेवा सुरू होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील
असल्याचे सांगितले.