पराग पष्टे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या संसदीय मंडळावर नियुक्ती

जनदूत टिम    07-Feb-2021
Total Views |
 
 
 
 
abc_1  H x W: 0
 
 
 
 
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नियुक्तीसोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या सोबत ६ कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष व संसदीय मंडळाची नियुक्ती केली आहे.
 
Parag Pashte02546_1 
 
संसदीय मंडळाच्या नियुक्ती मध्ये पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेते व किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांची नियुक्ती झाली असून त्यामुळे किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील वर्षभरापूर्वी पष्टे यांची अखिल भारतीय काँग्रेसचे किसान सेल चे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी पष्टे यांची महाराष्ट्र प्रदेश किसान सेल च्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या माध्यमातून पष्टे यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक आंदोलने करून विविध विषय सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता याची दखल घेवून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या संसदीय मंडळावर पष्टे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.