अंबरनाथ येथे उभारण्यात येणार मेडिकल हब

जनदूत टिम    03-Feb-2021
Total Views |

  • वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या बैठकीत मंजुरी
  • आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश
  • शासनाच्या २६ एकर जागेवर उभारण्यात येणार सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय

ठाणे : अंबरनाथ पूर्व भागातील सर्वे नं.१६६ येथील तब्बल २६ एकर शासकीय जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरिता पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर शासन स्तरावर पाठपुरावा करत होते. त्याअनुषंगाने बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

amit deshmukh5584_1  
 
या बैठकीत अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला असून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश देखील दिले आहेत.
 
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सह संचालक डॉ. चंदनवाले, नगरविकास विभागाचे सहसचिव संजय बानाईत, उपसचिव कैलाश बधान, उल्हासनगर प्रांत अधिकारी जयराज कारभारी, एमएमआरडीएचे वरिष्ठ नियोजक पाटील, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, सहायक नगररचनाकार राजेंद्र हेले आदी उपस्थित होते.