महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर संतोष दगडगावकर यांची निवड

जनदूत टिम    01-Feb-2021
Total Views |
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने नुकतीच ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र उदयजी सामंत यांच्या सुचनेनुसार राज्य ग्रंथ निवड समिती वरती अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली असल्याचा शासन निर्णय नुकताच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निघाला आहे.
 
nanded2587_1  H
 
ग्रंथालय चळवळ वाढवण्यासाठी, त्यांच्या योग्य न्याय व हक्कासाठी काम करताना दगडगावकर यांचा मंत्रालयामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी सतत पाठपुरावा असून राज्यभर दौरेदेखील केले आहेत. या सर्वांची दखल घेऊन त्यांची निवड झाली आहे.
ग्रंथ निवड समितीपुढे ग्रंथ ठेवत असताना ते शासन मान्य यादीत घेताना उत्तम व दर्जेदार असलेलेच ग्रंथ निवड केले जातील जेणे करून दर्जेदार ग्रंथ हाताळल्यानंतर त्यातून वाचकांच्या ज्ञानाची भूक भागेल व त्यांना प्रेरणा मिळेल, असे मत संतोष दगडगावकर यांनी व्यक्त केले.
 
या निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेशदादा पाटील, समन्वयिका सौ. रिताताई बावीस्कर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत लोंढे, अक्रूरमामा सोनटक्के, माजी विरोधी पक्षनेते जीवन पा. घोगरे, बालाजीराव शेळके, उत्तमराव आलेगावकर, युवक प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, युवक प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, दासराव पुयड, साहेबराव कोलंबीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पनाताई डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, मकसूद पटेल, केशव सुगावे, उत्कर्ष भोसीकर आदींनी अभिनंदन केले.