प्रत्येक आगंणवाडी सेविकेचा सन्मान वाढविनार -सभापती सौ.श्रेया गायकर यांचे शहापूर येथे प्रतिपादान

जनदूत टिम    04-Dec-2021
Total Views |
आदरणीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना श्री कपिलजी पाटील साहेब व आदरणीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्हा परीषद महीला बालकल्याण सभापती सौ.श्रेया श्रीकांत गायकर यांनी शहापुर येथिल महीला बालविकास प्रकल्पास व विविध अंगणवाडीस भेट दिली
 
शहापूर : जिल्ह्याच्या महीला व बालकल्याण सभापती सौ.श्रेया श्रीकांत गायकर यांनी संविधान दिवसाचे औचीत्य साधुन आज.दि.26 डीसे.रोजी शहापुर तालुक्यातील विविध आंगणवाडी केद्रांना भेटी दिल्या.त्या मधे प्रामुख्याने वासींद, खातीवली, दहागाव, दहागाव पवारपाडा यांचा समावेश होता.या भेटी दरम्यान सभापती महोदयांनी सेविका व लाभाथ्यांशी सवांद साधुन त्यांच्या समस्या जानुन घेतल्या.

shahapur_1  H x 
 
या दौरया दरम्यान त्यांनी शहापुर पंचायत समितीस भेट देवुन प.स येथिल महीला बालविकास कक्षास भेट दिली. सदर ठिकानी त्यांचा पचायत समिती शहापुर च्या सभापती सौ. यशोदा आवटे,व भाजपा शहापूर यांचे तर्फे सत्कार करन्यात आला.त्या नंतर त्यांनी उपस्थीत अंगणवाडी सूपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचेशी सवांद साधला त्यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री बागुल सर, प्रकल्प अधिकारी शहापूर श्री पोळ सर व इतर कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.