कुठल्याही पक्षात गेले तरी पळसाला पाने तीनच

जनदूत टिम    04-Dec-2021
Total Views |
आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पक्ष बघून मतदान करु नका. कारण पक्षबघून मतदान केले तर पश्चातापाची वेळ येईल. त्यासाठी पक्षापेक्षा ती व्यक्ति कशी आहेतीचीचाचपणी करुनचचांगल्या व्यक्तिला निवडून दयावे. कारण शहापूर तालुक्यामध्ये निवडणुका आल्या की, तळयातून मळ्यात मळ्यातून तळ्यातहेकायनविन नाही किंवा एखादया पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेल्याने शहापूर तालुक्यावर शोककला पसरणार असेही नाही किंवा पक्षाला खिंडारही पडणार नाही. कारण प्रत्येक पक्षाला वजनतेलायाची सवय झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपली रोजीरोटी कशी मिळेलयावरचजास्त भर दिला पाहिजे. आज शहापूर तालुक्यामध्ये मोठमोठे उमेदवार निवडून येत आहेत.
 
election_1  H x
 
परंतु शहापूरची परिस्थितीपाहिलीतरशहापूरतालुका हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी बाहेरगावावरुन येणाऱ्या आपल्या आई-बहिणीमुलांनाशाळेत घेऊन येत असतात. परंतु जी अत्यावश्यक बाब म्हणजेया शहापूर शहरामध्ये बस स्टॅण्डचे टॉयलेट वगळता कुठेही सार्वजनिक टॉयलेट पहायला मिळत नाही. ही खुप निंदनीय बाब आहे. प्रत्येकपक्षाचेनेते व कार्यकर्ते मोठमोठया वलगणा करतात. परंतुशहापूर तालुक्याच्या बारीकसारीकविकासाकडे कुणाचेही लक्ष नाही, शहापूर शहरामध्ये असलेलेमहसूल खातेयाखात्यामध्ये चाललेला अंदाधुंदी कारभार नेत्यांना दिसत नाही का? या महसूल खात्याला कुणाचं वरदस्त आहे.
 
शहापूरचेमहसूल खातंम्हणजे'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' अशाच पध्दतीचा असून या महसूल खात्याविषयी कोणी बोलतही नाही किंवा लिहितहीनाही का? अन्यायाला वाचा फोडायची असेल तर परिणामाला समोर जायची सुध्दा तयारी ठेवावी लागते तोच खरा पत्रकार प्रत्येक माणसाने मी आज ना उद्या मरणार आहे हे ध्यानात ठेवूनच वागले पाहिजे. शहापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत.
 
मग पाणी टंचाई असो, रस्ते असो, गोरगरिव जनता अक्षरश: होरपळून निघाली आहे. आज दोन महिने झाले लाहे गावाजवळ आपल्या भुमिपूत्र तरुणांचे वेस्टन कंपनीतील मजूरांचे आंदोलन सुरु असून त्या भुमिपूत्रांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यावर कोणीच तोडगा काढत नाही. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आपले उद्याचे पोट कसे भरेल याची चिंता असून आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता कुठे गेला? याचे सोयरसुतक कुठल्याच नागरिकाला नसून प्रत्येक जण आपआपल्या मोलमजुरीच्या विचारामध्ये गुरफटलेला आहे. यासाठी आपल्या शहापूर तालुक्याला चांगले दिवस हवे असतीलतरआगामीहोऊघातलेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्येपक्षन पाहता व्यक्ति बघूनच मतदान करावे. तरच आपल्या शहापूर शहराचा विकास होईल.