मृत व्यक्तीच्या नावाने कल्याण उपनिबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन

अविनाश जाधव    30-Nov-2021
Total Views |
कल्याण : कल्याण तालुक्यामध्ये सह दुय्यम निबंधक कार्यालय पाच आॅफीस मध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट असून कल्याण दुय्यम निबंधक कार्यालय मृत व्यक्तीचे रजिस्टर केल्यामुळे उघडकीस आले असून मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे.

kalyan_1  H x W 
 
त्या करिता महसूल विभाग यांनी दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण (रजिस्टर ऑफीस) पाच ऑफीसची चौकशी करावी. सब रजिस्टर कल्याण वर्ग एक हॉलीक्रॉस हॉस्पीटल जवळ असून दुसरा ऑफीस चिकन घर हॉलीक्रॉस शाळेजवळ असून तीसरा कल्याण तर्टे प्लाजा तीन ते चार ऑफीस असून पाचवू ऑफीस मलणगड रोड येथे असून सह दुय्यम निबंधक कार्यालय एक ते पाच कल्याण तालुक्याची चौकशी करावी. त्यात मोठा भ्रष्टाचार अढलून येईल.
 
आधारवाडी येथील श्री कॉम्प्लेक्स मधील मयत झालेल्या इसमाच्या नावावर असलेला गाळा खोटे बनावट दस्तऐवज बनवून सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कल्याण येथील चिकणघर उपनिबंधक कार्यालयाच्या आत चालत असलेला कथिट भ्रष्टाचारात गुरफटलेला चेहरा या गुन्ह्याने समोर आला आहे. उपनिबंधक कार्यालयात घर विकत घेण्यासाठी नोंदणीकृत करण्यासाठी मोठी गर्दी असते. दलालांच्या मदतीने अधिकाऱ्यांना मोठी आर्थिक रसद पुरवली जात असल्याने या कार्यालयात बेकायदेशीर काम केले जात असल्याचे बोलले जात आहे. असाच प्रकार आधारवाडीतील श्री कॉम्प्लेक्स मध्ये राहात असलेल्या परंतु मयत झालेल्या इसमाच्या बाबतीत उपनिबंधक कार्यालयात घडल्याचे आढळून आले आहे. या कॉम्लेक्समध्ये राहात असलेले गिरधारीलाल मल्हार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे की, गाळा धारक व मालक असलेले शिबा किंकर पॉल हे मयत झाले असताना उपनिबंधक कार्यालयात गाळ्याची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करताना त्यांच्या जागी अन्य इसम उभा करून बनावट व खोटा दस्तऐवज तयार करून संजय बिंदल, याने पंकज राठी व राम अग्रवाल राठी या दोघांशी संगणमत करून संजय याने तो गाळा विकत घेतल्याचे भासविले.
 
मयत इसमांच्या नावावर खोटे दस्तऐवज बनविल्याने गिरधारीलाल यांनी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केल्याने उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी यामुळे अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन के यशवंतराव या बाबत अधिक तपास करीत आहेत. चिकणघर उपनिबंधक कार्यालयाला दलालांनी घेरलेअसून उपनिबंधक कार्यालयात दलालांशिवाय नागरिकांची कोणतीही कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. उपनिबंधक कार्यालय भ्रष्टाचाराची बजबजपूरी झाली असून दोषिवर कारवाईची मागणी केली जात आहे.