दोन अपघातात कर्जत तालुक्यातील दोन वारकरी आणि एका वाहन चालकाचा मृत्यू

गणेश पवार    28-Nov-2021
Total Views |
कर्जत : कामशेत आणि माणगाव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात कर्जत तालुक्यातील दोन महिला वारकरी आणि एका वाहनचालक यांचा मृत्यू झाला.

ghatna_1  H x W 
 
वारकरी महिला आळंदी यात्रेसाठी निघाल्या होत्या. 26 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत मधील एकाच कुटुंबातील 40 जण रायगड किल्ले पर्यटनासाठी जाऊन परत येत असताना त्यांच्या प्रवासी बस ला रायगड पाचाड-निजामपूर रस्त्यावर माणगाव जवळ अपघात झाला.त्या अपघातात त्या गाडीचा चालक मृत्युमुखी पडला असून अन्य जखमींवर नवी मुंबई येथील रुग्णालयातील रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व जखमींवर आज एमजीएम रुग्णलयात शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती या पर्यटन सहलीशी संबंधित शरद ठाणगे यांनी दिली आहे.
 
अपघात घडल्यानंतर माजी आमदार सुरेश लाड यांच्या सूचनेनंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी सर्व रुग्णाना नवी मुंबईत आणि जखमी नसलेल्या व्यक्तींना कर्जत येथे पाठविण्यासाठी रुग्णवाहिका उपल्बध करून दिल्या होत्या.
हि घटना ताजी असतानाच 27 नोव्हेंबरच्या सकाळी सूर्य उगवत असताना खालापूर तालुक्यातील उम्बरे येथून आळंदी कडे निघालेल्या लक्ष्मण महाराज येरम यांच्या पायी वारी मध्ये पिकअप टेम्पो घुसला. त्यावेळी झालेल्या अपघातात खालापूर तालुक्यातील दोन आणि कर्जत तालुक्यातील दोन अशा चार वारकरी यांचा मृत्यू झाला. त्या चार वारकरी यांच्यात कर्जत तालुक्यातून या दिंडीत सहभागी झालेल्या असाल ग्रामपंचायत मधील भूतीवली येथील जयश्री आत्माराम पवार -54आणि कर्जत शहरातील संगीता वसंत शिंदे-56 या दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला.
 
रेल्वे पट्ट्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आत्मारामबुवा पवार हे सपत्नीक या दिंडीत सहभागी झाले होते. या दोन्ही घटनांमध्ये कर्जत तालुक्यातील तिघांचे बळी गेले आहेत. कामशेत जवळील सापे गावाच्या हद्दीत माउली चॅरिटेबल ट्रस्टची पायी वारी पालखी आळंदीकडे मार्गक्रमण करीत होती. वारीमध्ये पिकअप टेम्पो घुसून वारकऱ्यांना चिरडले असल्याची घटना घडताच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी कामशेत येथे जाऊन जखमींना तात्काळ उपचार मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले.तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकरी यांची भेट घेऊन विचारपूस केली.