आगरी समाजासाठी प्रतीक जुईकर हे प्रतिबिंब ठरले आहेत-कपिल पाटील

गणेश पवार    28-Nov-2021
Total Views |

  • आगरी समाज अल्पसंख्याक ठरणार नाही

कर्जत : आगरी समाजाला इतिहास असून आठ कोटी आगरी देशात अल्पसंख्याक ठरणार नाही आणि हा समाज अनेक मतदारसंघात बदल घडविण्याची ताकद आहे असे ठाम मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिले आयएएस प्रतीक जुईकर आणि आगरी समाजातील 220 विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
 
aagr44_1  H x W
 
कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस अधिकारी प्रतीक जुईकर, शूरवीर रेल्वे कर्मचारी मयूर शेळके यांचा नागरी सन्मान करण्यात आला. तर कर्जत तालुका आगरी समाज भूषण पुरस्कार यावर्षी इतिहास संशोधक वसंतराव कोळंबे यांना सन्मानचिन्ह आणि स्कुल बॅग भेट देण्यात आली.त्यावेळी व्यासपीठावर कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव,रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,संघटनेचे उपाध्यक्ष केशव मुने,सचिव शिवराम बदे,मंगेश म्हसकर,स्वतन्त्रसैनिक यांचे नातेवाईक शरद भगत,विठ्ठल पाटील,रवी मसणे,आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील दहावी आणि बारावी मधील 80 टक्के हुन अधिक गुण मिळविणाऱ्या 220 विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तर आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळविणारे ऍड गजानन डुकरे,तसेच देवराज गजानन डुकरे यांचा आणि शिष्यवृत्ती स्पर्धेत पारितोषिक मिळविणारे यांना सन्मानित करण्यात आले.
 
केंद्रीय पंचायत राज खात्याचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना आगरी समाजाला हा जिव्हाळा जपणार समाज आहे आणि गोडवा देणारा म्हणून या समाजाची ओळख आहे हे आपल्याला नवी दिल्लीत दिसून आले आहे.स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेल्या कर्जत तालुक्यातील हिराजी पाटील हे देशातील आगरी समाजाचे पहिले हुतात्मे ठरले आहेत.त्यामुळे प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व या भूमीत जन्माला आले असून आपण आजच्या कार्यक्रमाला मंत्री आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलो नाही तर समाजाचा समाज घटक म्हणून आलो आहे.शिक्षणात आपला समाज मागे होता,पण आता प्रतीक जुईकर यांनी समाजाचा दुसरा आणि रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस बनून आमच्यासाठी अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.शिक्षणात बनलेले हे आमूलाग्र बद्ल समाजाने स्वीकारले आहेत याचा अभिमान असल्याने आपल्या समाजासाठी थेट आयएएस बनलेले प्रतीक जुईकर हे समाजाचे प्रतिबिंब ठरले असून भविष्यात आपल्याला डॉ रवींद्र शिसवे यांच्यानंतर अनेक वर्षांनी आयएएस बनलेले प्रतीक जुईकर यांनी परंपरा निर्माण केली आहे.
 
ही परंपरा आता आम्हाला मोजता आले नाही पाहिजे एवढे आयएएस आयपीएस अधिकारी समाजात बनले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.आज आपण पाहुणे म्हणून आलो आहोत,पण प्रतीक जुईकर हे कधीही माझ्या खुर्चीवर प्रमुख पाहुणे म्हणून बसू शकतात, पण मी आयएएस बनू शकत नाही हा प्रशासकीय अधिकारी यांच्यात फरक आहे असे मत कपिल पाटील यांनी मांडले.प्रतीक जुईकर यांनी आपल्या सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे ,तो आदर्श समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.कारण माझ्यासमोर बिहार,उत्तर भारतातील आयएएस अधिकारी माझ्यासमोर नवी दिल्लीत आले आहेत,आगदी काळात दिल्लीत देखील आगरी समाजाचे अधिकारी दिसतील असा आशावाद व्यक्त केले.त्यामुळे अशी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सर्वांना संघटित राहिले पाहिजे आणि मधमाशी साठी चिकटून राहून यश संपादन करावे आणि त्यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेने स्पर्धा परीक्षा यांची तयारी साठी केंद्र सुरू करण्याचे आवाहन केले.या केंद्रासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी केले.
 
74 वर्षातील पहिला आगरी मंत्री
देशाच्या 74 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा आगरी समाजाचा मंत्री बनला आहे.त्यामुळे आपण जनसंवाद यात्रा मी काढली. त्यात 74 वर्षात पहिला आगरी मंत्री झाला आणि एवढा मोठा सन्मान केला आणि त्या जनसंवाद यात्रेला आपल्या समाजाची लोक जाऊ नयेत म्हणून काही नेते मंडळी अडवणूक करीत होते.पण आदेश आल्यानंतर देखील अन्य पक्षातील लोक माझ्या जनसंवाद यात्रेच्या गाडीवर चढले आणि हे आगरी समाज कोणाचेही आदेश मानत नाहीत हे आमच्या आगरी समाजाचा सन्मान आहे असे सांगतानाच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेने 64 वर्षे हा कार्यक्रम अखंडित सुरू ठेवला आहे.त्यापेक्षा आपले वय कमी आहे आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील आगरी समाजाची उंची मोठी आहे.ग्रामीण भागातून विद्यार्थी पुढे येत असल्याचे पाहून आपण पूर्ण अभ्यासाअंती देशातील पावणे तीन लाख ग्रामपंचायती मध्ये ई लायब्ररी सुरू करणार आहोत. आमच्या विभागाने हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाला पुढे ठेवला आहे अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.तर कर्जत तालुक्यातील रेल्वे रुळावर उतरलेल्या मयूर शेळके या रेल्वे कर्मचारी यांना केंद्र सरकारचा शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ शिफारस करेल असे आश्वासन दिले.शेळके यांनी जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त केली असता माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत जिल्हा परिषद येत असून मी दखल घेतली म्हणजे त्यात सर्व जिल्हा परिषद माझ्या अखत्यारीत येत आहेत, त्यामुळे योग्य ती दखल घेतली जाईल असे आश्वासन देखील यावेळी दिली.
 
रेल्वे स्थानकांना नावे देणार
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कर्जत तालुक्यातील दोन हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे.त्या हुतात्म्यांची आणि क्रांतिकारक यांची नावे कर्जत,नेरळ,भिवपुरी रोड रेल्वे स्थानक यांना देण्याची मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी या कार्यक्रमात आहे.त्याबद्दल केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल रोड, नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील आणि भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला क्रांतिकारक भगत मास्तर रोड ही नावे देण्याबाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कपिल पाटील यांनी जाहीर केले.यावेळी प्रतीक जुईकर यांनी आपण आजच मसुरी येथे ट्रेनिंग साठी जात असून आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना सोशल मीडियावर आणि वैयक्तिक मदत करीत असून आपल्या भागातून आणखी आयएएस अधिकारी बनावेत यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिला.त्याचवेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा आणि परीक्षेची नियमावली याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.प्रतीक जुईकर यांनी यावेळी आपली आंतरिक इच्छा असावी लागते,सुप्त इच्छा आणि चिकाटी ही पूर्ण असावी,कारण या परीक्षेत तब्बल 99 टक्के हुन अधिक अपयश येणारे असते ही बाब लक्षात घेऊन मनाची तयारी करावी लागते आणि दहावी पासून मी सोशल मीडियावर माझ्याकडून सर्वांना सहकार्य करीत आहे.