माल्हेडचे जगदीश किसन पवार यांचा केला सत्कार

जनदूत टिम    22-Nov-2021
Total Views |

  • स्वच्छ भारत अभियानात मुरबाड नगर पंचायतिला 3 स्टार

मुरबाड : मुरबाड नगरपंचायत यांनी आरोग्याची मुरबाडकरांची चांगली काळजी घेतल्याने दिल्ली येथे विज्ञान भवन येथे मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, आणि आरोग्य विभागात कामं करणारे माल्हेडचे सुपुत्र नगर पंचायतीचे कर्मचारी जगदीश पवार यांचा सत्कार स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय सेक्रेटरी हार्दिकसिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आला.
 
Murbad_1  H x W
 
ही अभिमानास्पद बाब लक्षात येता भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी माल्हेड येथे जगदीश पवार यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसरपंच प्रवीण पवार, संजय पवार, भरत पवार, संतोष (चाचू ) पवार इत्यादी उपस्थित होते.यावेळी माल्हेडचे गावकरी यांच्या मध्ये आनंदचे वातावरणात निर्माण झाले होते.
 
मुरबाड विधानसभा मतदार संघांचे आमदार किसनजी कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाड शहर नगरपंचायत अतिशय सुंदर आणि स्वच्छ करून मुरबाडचा चेहरा बदलून एक प्रेरणा इतर नगरपंचायतिने घेण्या सारखे कामं केले आहे. मुरबाड शहरांत भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे काम आमदार कथोरे साहेबांनी केल्याने मुरबाड नगरपंचायतिचा मान आज अभिमानाने दिल्ली येथे झलकत आहे ही बाब मुरबाड करांसाठी अभिमानास्पद आहे.त्यामुळे मुरबाड नगरपंचायातीचे मुख्याधिकारी कंकाळ आणि कर्मचारी जगदीश पवार यांचे कौतुक होत आहे.