पालकमंत्री यांच्या हस्ते तेरा चारचाकी पोलीस वाहनाचे हस्तांतरण

जनदूत टिम    18-Nov-2021
Total Views |
पालघर : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे कमी झाले आहे. परिसरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक असणाऱ्या सुविधा शासन पुरविणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केला.
 
Dadaji Bhuse_1  
 
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला 13 चारचाकी पोलीस वाहन पालकमंत्री दादाजी भूसे यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना आचोळे पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हस्तांतरण केले. त्यावेळी पालकमंत्री दादाजी भूसे बोलत होते.
 
ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून नविन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय नविन असल्याने पोलीस विभागाला पोलीस स्टेशन उभारण्यासाठी,निवास्थानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.. जिल्हा नियोजन समिती मार्फत पोलीस दलाला गस्त घालण्यासाठी 72 दुचाकी वाहन उपलब्ध.करुन देण्यात आली आहेत.पोलीस दलातील शिपाई पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवास्थानाचा प्रश्न सोडविण्यात येईल. महिला पोलीस यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
 
आव्हानात्मक परिक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी पोलिस आयुक्त सदांनद दाते यांच्यावर शासनाने सोपविली आहे.व त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. या भागामध्ये गुन्ह्यांची उकल 75 टक्के पर्यत पोहचली असून येत्या काळात पोलीस आयुक्त श्री. दाते हे प्रयत्न 100 टक्क्यावरपर्यत नेतील असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भूसू यांनी यावेळी व्यक्त केला.
 
पोलीसाच्या सतर्कतेमुळे परीसरातील नागरीकांना सुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. कोणत्याही नागरीकांवर अन्याय होऊ नये यासाठी पोलीस प्रशाससनाने कायद्याच्या चौकटीत राहुन काम करणे आवश्यक आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पालघर जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री श्री ठाकरे हे वेळोवेळी, जिल्ह्याच्या समस्यांवर, रोजगार निर्मिती तसेच विकास कामे या सर्वांचा आढावा घेत असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी मुख्यमंत्री श्री ठाकरे निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वासही पालकमंत्री श्री भूसे यांनी व्यक्त केला.
 
यावेळी खासदार राजेंद्र. गावित, आमदार रविंद्र फाटक, मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस अप्पर आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील, प्रशांत वाधुडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी पेल्हार पोलीस चौकीस भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या मोरेगाव येथील नवीन पाण्याच्या टाकीची पाहणी तसेच त्या लगतच्या चार एकर शासकीय जागा विकसीत करण्यासाठी जागेची पाहणी पालकमंत्री यांनी केली.
 
वसई-विरार महानगरपालीका अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन नागरीकांना पायाभूत सुविधा महापालीकेने उपलब्ध करून द्याव्यात अश्या सूचना पालीका आयुक्त गंगाथरन डी यांना केल्या.