एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प स्तरीय शासकीय कमिटी बाबत शहापूर तालुक्यावर पूर्णपणे अन्याय - अपर्णा खाडे

जनदूत टिम    11-Nov-2021
Total Views |
शहापुर : गेल्याच आठवड्यात दि. ४ नोवेंबर 202१ रोजी शहापुर येथील शहापूर मतदार संघातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय' शहापुर जि.ठाणे येथील प्रकल्पस्तरीय शासकीय समिती वरील अध्यक्ष व सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली. परंतू या समितीमध्ये शहापूर तालुक्यावर पूर्णपणे अन्याय करण्यात आला आहे.
 
dr5_1  H x W: 0
 
वास्तविक पाहता शहापुर तालुका १००% आदिवासी (एकमेव) तालुका म्हणून ठाणे जिल्ह`यात गणला जातो. प्रत्येक वेळी शहापूरचा. अध्यक्ष व सदस्य संख्येतही शहापुरला मान दिला जात होता. अध्यक्ष पद हे वस्तूत: १०००% आदीवासी संख्या असलेल्या तालुक्याला दिले जाते.
 
परंतु ह`या वेळेस नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प स्तरीय समिती शहापुरवर अन्याय झाला आहे. हे सर्व बाधक आहे. सत्तेचा गैरवापर करून ही सदस्य संख्या भिवंडी तालुक्याला जास्त प्रमाणात देण्यात आली आहे. भिवंडी (35), मुरबार (54) व उर्वरित तालुके है अंशतः आदिवासी आहे. हे लोकशाहीला बाधक आहे की शहापुर वर अन्याय करून हे अध्यक्षपद व सदस्य संख्याही भिवंडी तालुका अंशतः असतांना केवळ आणि केवळ राजकीय हस्तक्षेप करून हे करण्यात आले आहे.
 
तसेच हया कमिटीमध्ये महाविकास आघाडीतील-सर्व - पक्षिय सदस्य पाहिजे होते. आणि आदिवासी मंत्री महोदय मा. ना. पाडवी साहेब हे काँग्रेस पक्षाचे असतानांही काग्रेसला योग्य तो न्याय दिलेला नाही. जर का, अध्यक्षच काँग्रेसला दिला गेला असता तर पक्ष वाढीच्या दृष्टीने ही हे फाय‌द`याचे ठरले असते. तरी माझी आपणास नम्र विनती आहे की. हया कमिटी फेरविचार होऊन योग्य तो बदल घडावा. आणि योग्य तो न्याय - निवाडा होऊन सर्वांना न्याय मिळावा.