मंत्रिमंडळाचा निर्णय : मुंबई महानगरपालिकेत ९ नगरसेवक वाढणार

जनदूत टिम    11-Nov-2021
Total Views |
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेतील ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे.
 
BMC_1  H x W: 0
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय या पूर्वीच मंत्रिमंडळाने घेतला आहे.मुबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या फेब्रूवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ एवढी होणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे.ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे.
 
2०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली.2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ झाली आहे. वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते.त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले.त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.