वाढदिवस मा किसन कथोरेंच्या शिलेदाराचा - मा. अरुणजी पाटील या विकासकाचा

जनदूत टिम    08-Oct-2021
Total Views |
माननीय आमदार किसन कथोरे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात अनेक व्यक्तिमत्व घडवले. अनेकांना यशलक्ष्मीचं जणू दर्शनच घडवुन दिला आहे. या व्यक्तीं मधीलच एक अनोख व्यक्तिमत्व म्हणजे मा.अरुण बाळू पाटील हे होय.अरुण पाटील साहेब हे अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आले. वडील सरकारी नोकरीत होते. तसा कौटुंबिक वारसा स्थिर होता. पण मध्यमवर्गीय जीवन त्या व्यक्तिमत्वाला लाभल. आई मालतीबाई यांनी उपसरपंच पदाची धुरा सांभाळली आणि अगदी त्याच वातावरणामुळे अरूण जी पाटील साहेब यांच्याही मनावरती समाजसेवेचं अंकुर उमललं आणि ते समाजसे वेकडे ओढले गेले.
 
arun_patil_vch_1 &nb
 
सुरुवातीला मा.आमदार किसन कथोरे साहेब यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत गेला.अरुणजी पाटील साहेबांनी 2008 साली राष्ट्रवादी पक्षातून राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्यावर राष्ट्रवादीतून कल्याण शहर सेवा दल अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांची कामाची तडफ आणि उंच भरारी घेण्याची ऊर्जा पाहून त्यांना त्यानंतर दोन वेळा कल्याण ग्रामीण मध्ये कार्याध्यक्ष पद देण्यात आले.
 
अरुण जी पाटील साहेब हे राष्ट्रवादीत अतिशय प्रामाणिकपणे काम करत असायचे.त्यांची ऊर्जा आणि त्यांची मेहनत हे कायम त्यांचे भूषण राहिल आहे. राष्ट्रवादीत असताना माननीय आमदार किसन कथोरे हे कायम त्यांना ऊर्जा देत असत. आमदार किसन कथोरे साहेबांनी 2014 साली राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. साहेबांचा निर्णय हा आपल्याही आणि समाजाच्या दृष्टीने योग्य म्हणून शिरसावंद्य मानून अरुणजी पाटील साहेबांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यांनी जणू मनाशी ठरवलेलं होतं की आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि कायम प्रेरणा रुपी कल्पवृक्षाला म्हणजेच माननीय आमदार किसन कथोरे यांना आपण कधीच सोडायचं नाही त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्या आणि समाजाच्या हिताचा असेल हे मानून ते कायम किसनजी कथोरे यांच्यासोबत राहिले.
 
माननीय किसन जी कथोरे साहेब मित्रपरिवार या फाऊंडेशनचे सध्या ते अध्यक्षपद भूषवतात आणि सर्व परिवाराला एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.सध्या भाजप पक्षात ते कल्याण जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी भूषवत आहेत.साहेबांच्या प्रेरणेतून आणि अरुण जी पाटील यांनी दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढण्याचे ठरवले. 30 मार्च 2021 रोजी ते निवडणूक लढले. त्यांच्यातली काम करण्याची ऊर्जा, त्यांची कल्पनाशक्ती आणि नाविन्य क्षमता पाहून सर्व सभासदांनी त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचे उपाध्यक्ष पद देण्याचे ठरवले आणि 12 एप्रिल 2021 रोजी ते दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे उपाध्यक्ष झाले. हा त्यांच्या जीवनात एक अनोखा प्रसंग होता जीवनात एक वेगळं काहीतरी करण्याची संधी होती आणि त्या दृष्टिकोनातून ते कायम आपल्या कार्यातून यशस्वी वाटचाल करत आहेत.
 
सुरुवातीला अरुणजी पाटील साहेबांनी छोटे मोठे कंत्राट घ्यायला सुरुवात केली. हळू हळू त्यांची या बांधकाम व्यवसायत प्रगती होत गेली. चिकाटी आणि जिद्द, मेहनत करण्याची प्रचंड तयारी आणि सौंदर्यदृष्टी यामुळे ते यशस्वी होत गेले. आणि अखेर ते बांधकाम क्षेत्रात एका मोठ्या शिखरावर पोहोचले.आज ते कल्याण शहरातील एक नामवंत बिल्डर म्हणून प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ दीड हजार लोकांना घरं मिळवून दिली आहेत. कामात प्रचंड दर्जा आणि घरांच्या बांधकामा मध्ये सौंदर्य दृष्टी ठेवून केलेली कलाकृती हे त्यांच्या कामाच वैशिष्ट्य आहे.
 
स्वतःची व्यावसायिक प्रगती एवढ्या वरती हा माणूस थांबला नाही. त्या माणसानं आपल्या आईपासून आणि वडीलान पासून घेतलेला समाजसेवेचा वसा कायम चालू ठेवला आहे. दरवर्षी ते अनेक मुलांना शालेय साहित्याचे वाटप करतात. आणि गरीब गरजू मुलांना त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी सहकार्य करतात. मदत करतात. अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक स्वरूपाची मदत करतात साहेबांनी वेळोवेळी झालेल्या पूर परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक हजारो लोकांना आर्थिक किंवा अन्नधान्य स्वरूपात मदत केली आहे. हे त्यांचे कार्य खरोखर त्यांच्या जीवनाला आणि व्यक्तिमत्त्वाला परोपकारीतेचा उजाळा देतो. साहेबांना सामाजिक-राजकीय काम करताना अनेक अडचणी उद्भवल्या पण हा माणूस थांबला नाही.कधीच हरला नाही. कधीच थकला नाही. वडिलांनी सांगितलेल्या सुविचाराचा आणि सल्याच त्यांनी कायम स्मरण ठेवले त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं नेहमी चांगलं काम करत राहा कधीच कोणाच वाईट करू नको आणि हे त्यांच्या वडिलांचे वाक्य ते कायम त्यांच्या स्मरणात ठेवतात आणि म्हणूनच ते कायम यशस्वी आहेत. यशश्री त्यांच्यावर भरभरून प्रसन्ना आहे.
त्यांच्यातली ही ऊर्जा कायम अशीच राहो आणि त्यांची आर्थिक राजकीय वाटचाल अधिक भरगच्च होवो ही प्रार्थना
त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
- माननीय अरुण बाळू पाटील
( उपाध्यक्ष)
दि ठाणे जी मध्य बँक
श्रेया पॅलेस ,
रामबाग ,
कल्याण वेस्ट