भिंवडी तहसिल कार्यालयात विधी सेवा फलकाचे अनावरण

30 Oct 2021 01:09:01
अनगांव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती प्राधिकरण मूबई यांच्या समान न्याय व कायदेविषयक सहाय्य या संकल्पनेतून व भिवडी तालूका विधी सेवा समितीच्या वतीने भिंवडी तहसिल कार्यालयात कायदेविषयक विधी सेवा फळकाचे अनावरण भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष मंजित राऊत यांचे हस्ते करण्यात आले.

vakil_1  H x W: 
 
नागरिकांना कायद्याविषयी माहिती नसते, गरिबातील गरिब नागरिक न्यायापासून दूर राहू नये,त्याला कायद्याची माहिती मिळावी, म्हणून त्याला मोफत कायदेशीर सल्ला या सूविधे मर्फत मिळणार आहे. हेल्पलाईन नंबरवर फोन करून मोफत कायदेशीर सल्ला घ्यावा,असे अवाहन भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष मंजित राऊत यांनी केले,राज्याच्या अमूतमोहत्सवी वर्ष या अनूषगांने राज्य सरकारने नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन हेल्पलाईन द्वारे उपलब्ध करून दिले आहे, त्याचा लाभ घ्यावा असे मत भिंवडीचे निवासी नायब तहसिलदार गोरख फडतरे यांनी केले,कूणीही न्यायापासून वंचित राहू नये न्याय आपल्यादारी या उद्देशाने राज्यसरकारणे व विधी सेवा समितीने हा उपक्रम सूरू केला आहे ,त्याचा प्रचार, प्रसार, करून शेवटच्या माणसाला त्याचा लाभ मिळेल या करीता सर्वानी प्रयत्न करायला हवे अशी माहीती भिंवडी वकील संघटनेचे सचिव अँड जितेंद्र पाटील यांनी दिली, या कार्यक्रमास भिंवडी म़डळ अधिकारी आदेश म्हात्रे,संघटनेचे माजी अध्यक्ष हर्षल पाटील अँड नारयण अय्यर, सदस्य अंकीत कडू,अलसबा मोमीन, व अँड मयूरेश पाटील अँड रोहीदास पाटील, अँड अमरीश भोई, अँड संदेश गायकवाड,अँड शिवाणी चोणकर,अँडमहेश वडलकोंडा,अँड मंगेश चोरे,अँड मनोज पाटील, अँड झैन असारी,गित जैनउपस्थित होते,भिंवडी न्यालयाचे मूख्य न्यायदंडाधिकारी परवेज शहजाद याच्या पूढाकाराने हा उपक्रम शहरातील पाच शासकीय कार्यालयात करण्यात आला. भिवडी तहसील, भिवडी महानगरपालिका,दाडेकरवाडी, ब्राह्मणआली,धामणकरनाका,विद्याश्रम पोष्ट कार्यालयात फलकाचे अनावरण करून करण्यात आला.नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते.
 
Powered By Sangraha 9.0