एअर इंडियाच्या महाराजाचा जन्म पनवेलचा !

11 Oct 2021 18:38:42
गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियाचे बोधचिन्ह म्हणून वापरत असलेल्या ‘महाराजाचे’ शिल्प पनवेल या ऐतिहासिक नगरीत घडले आहे. पनवेल शहरातील महात्मा फुले मार्गावरील जोगळेकर वाडयात माईणकर या नावाचे एक शिल्पकार राहत होते. मातीच्या बाहुल्या, खेळणी व विविध मूर्ती बनविण्याचा त्यांचा छोटासा कारखाना या वाडयात होता.
 
air india maharaja_1 
 
1955-56 च्या दरम्यान एअर इंडियाने बोधचिन्हासाठी वृत्‍तपत्रांत जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून माईणकरांनी स्वत: तयार केलेली महाराजाची मूर्ती एअर इंडियाकडे पाठवून दिली. विनयाने कमरेत वाकून उजव्या हाताने या असे खुणवीत स्वागत करणार्‍या भारतीय पेहरावातील महाराजाचे हे अभिजात ‘शिल्प’ एअर इंडियाच्या पसंतीस उतरले.
 
माईणकरांनी तयार केलेले हे महाराजाचे शिल्प एअर इंडियाने बोधचिन्ह म्हणून वापरायचे ठरविल्यावर या शिल्पाचे सर्वाधिकार पाच हजार रूपयांत माईणकरांकडून विकत घेतले आणि माईणकरांचा हा महाराजा एअर इंडियाचे बोधचिन्ह होऊन सार्‍या जगभर दिमाखात फिरु लागला.
Powered By Sangraha 9.0