पड़घा डम्पिंग ग्राउंड साठि आरक्षित जागा पडघा ग्राम पंचायतने भाजप पदाधिकारी असलेल्या खाजगी विकासकाला विकल्याचा पडघा राष्ट्रवादी शहर अध्यक्षाचा दाव्याने खळ बळ

06 Jan 2021 22:36:26
पड़घा : स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूका जवळ येत असतानाच भिवंडी तालुका मधिल पडघा ग्राम पंचायत पुनः एकदा खळबळ जनक दाव्याने चर्चेत आली आहे.
 
dumping_1  H x
 
पडघा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रंजित साळुंखे यांनी व्हिडीओ द्वारे खळबळजनक दावा केला आहें की पडघा ग्राम पंचायत चा कचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित असलेली खड़वली फाट्यावरिल सर्वे नंबर ३७ ३८ ३९ चीं डम्पिंग ग्राउंड चीं हक्काची जागा असताना सदर कचरा हा लोकवस्थी असलेल्या ठिकाणी टाकला ज़ातोय या संदर्भात ग्राम सेवकांना विचारले असता सर्विस रोड चा कामा मूळे कचरा तिथे टाकता येत नाही असे त्यांनी सांगीतले परंतु सदर दावा धादांत खोटा असुन सदर जाग़ा ही माजी ग्राम पंचायत सदस्यांनी ठाणे ज़िल्हयातील एका मोठया नेत्याचा घशात घातल्याच्या त्यांचा दाव्याने पडघा परिसरात एकच खळबळ माजली आहे.
 
सदर प्रकारनाची चौकशी करण्यात यावी व ग्राम पंचायत सदस्यांकडे लाखोंचा गाड़या ,सम्पत्ति कशी याची देखिल चौकशी व्हावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलें आहे. पड़घा ग्राम पंचायत चा शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामाचा विषय दैनिक जनदूत ने लाऊन धरला होता अखेर तहसीलदार भिवंडी यांनी संबंधित बांधकाम जमीन दोस्त करून तीन ग्राम पंचायत सदस्यांवर तलाठी पडघा मार्फ़त गुन्हे देखिल नोंद करण्यात आले आहेत त्याचा तापस सूरू आहें,तसेच अभय देणाऱ्या ग्राम सेवकाची रातोंरात उचल बांगडी देखिल करण्यात आली होती.
 
त्यामुळे राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी क़ेलेल्या दाव्या मध्ये तथ्य असल्याचा सूर पडघा ग्रामस्थानमधून उमटू लाग़ले आहेत आणि याचे परिणाम आगामी निवडणूकीत पहायला मिळतील असे देखिल सांगण्यात येत आहें

Powered By Sangraha 9.0