दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची रीतसर चौकशी व्हावी- विद्याधर कांबळे

जनदूत टिम    29-Jan-2021
Total Views |
दत्तवाड तालुका शिरोळ ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षांमध्ये झालेला आहे. तरी या झालेल्या भ्रष्टाचाराची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणी दत्तवाड येथील सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कांबळे व त्यांच्या शिष्टमंडळाने शिरोळ पंचायत समिती गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
dattavad0254_1  
 
निवेदनात दत्तवाड ग्रामपंचायत मध्ये सन 2015 ते सन 2020 मधील चौदाव्या वित्त आयोगातील निधी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा दोषीवर कारवाई झालेली नाही. तरी या झालेल्या भ्रष्टाचाराची रीतसर चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्यात यावी. निवेदनावर रविंद्र कांबळे, पृथ्वीराजसिंग राजपूत, अश्विन कुमार बिरणंगे यांच्या सह्या आहेत.