महादेव पंजाबी यांचा वाढदिवस समाज सेवेतून साजरा

जनदूत टिम    22-Jan-2021
Total Views |
कल्याण : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते.
 
panjabi_1  H x
 
हे आजार होऊ नये यासाठी पत्रकार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा व अल्पदरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन ईशा नेत्रालय यांच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार कै. नरसिंह खानोलकर (कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघ) येथे करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत नेत्र तपासणीबरोबरच रुग्णांना चष्मे व आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.
 
वयाच्या ६० वर्षानंतर होणारे आजार आता कमी वयोगटातही दिसू लागलेत. ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या दोन मुख्य आजारांमध्ये हाडांचा ठिसूळपणा आणि सांध्यांची झीज याचा समावेश होतो. बदलत्या काळाप्रमाणे आपण ज्येष्ठत्वाची व्याख्या बदलायला हवी. पूर्वी वयाच्या ६० वर्षानंतर ‘ज्येष्ठ’ असं संबोधण्यात यायचं. पण आजच्या काळात वैद्यकशास्त्र अधिक प्रगत झाल्यामुळे आयुर्मान वाढलंय. म्हणूनच अनेकजण वयाच्या ७० वर्षातही बरेचसे कार्यरत असतात. पण दुसरीकडे असंही आढळतंय की, वयाच्या ६० वर्षानंतर होणारे आजार आता कमी वयोगटातही दिसू लागलेत.
 
ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या दोन मुख्य आजारांमध्ये हाडांचा ठिसूळपणा आणि सांध्यांची झीज याचा समावेश होतो हे लक्षात घेता महादेव पंजाबी यांनी हाडांची तपासणी सुध्दा पत्रकार कक्षात ठेवली होती. यामध्ये १००हून पत्रकारांनी आपली उपस्थिती दाखवत मोफत तपासण्या करून घेतल्या. यावेळी संतोष घोडेस्वार, आनंद खामकर, विमलेश मोर्य व दिलीप पुरी याचे सहकार्य लाभले.