नमिता मयुर पाटील आयोजित आमदार चषक २०२१

22 Jan 2021 12:15:15
कल्याण : क्रिकेट हा खेळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये प्रत्येक विभागामध्ये खेळला जातो. प्रत्येक गल्लीमध्ये चांगले खेळाडू जन्माला येऊन ते आपल्याला आयपीएल किंवा वर्ल्ड टूर्नामेंट खेळताना दिसून येतात. हे लक्षात घेता टिटवाळा बल्यानी माजी नगरसेविका नमिता मयुर पाटील आणि मयुर पाटील यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
 
namita_1  H x W
 
आमदार चषक २०२१ असे या क्रिकेट सामन्यांचे नाव ठेवण्यात आले आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर त्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे आयोजक मयुर पाटील यांनी सांगितले. सोशल डिस्टंसिंग चे पालन करून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
प्रभागातीलच नव्हे तर शहरातील खेळाडूंच्या कला गुणांना वाव देण्यासाठी मी दरवर्षी विविध खेळ, स्पर्धा तसेच उपक्रम मयुर पाटील राबवित असतात .कल्याण आमदार विश्वनाथ भोईर शुभहस्ते क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रथम पारितोषिक १ लाख, द्वितीय पारितोषिक ५० हजार, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये आणि आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे मयुर पाटील यांनी सांगितले. २१ ते २४ जानेवारी मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये ३२ संघांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0