सुरक्षा रक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे अंगणवाडी सेविकेचे हरविलेले एटीएम कार्ड परत मिळाले

जनदूत टिम    19-Jan-2021
Total Views |
पाली/गोमाशी : पालीतील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएमचा सुरक्षा रक्षक संदेश उर्फ शाम राऊत याने महिलेचे पिन नंबरसह हरविलेले एटीएम कार्ड नुकतेच त्या महिलेला परत केले आहे. शामच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
atm card558_1  
 
सुधागड तालुक्यातील अडुळसे येथील अंगणवाडी सेविका मनिषा मनोहर पोंगडे यांचे पिनकोड सह एटीएम कार्ड हरविले होते. एटीएम कार्ड असलेल्या अकाउंटमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये होते. हे एटीएम कार्ड सुरक्षारक्षक संदेश उर्फ शाम राऊत यांना सापडले. संदेश उर्फ शाम या इमानदार सुरक्षारक्षकाने त्या महिलेस संपर्क करून लागलीच हे एटीएम कार्ड दिले.
 
याबद्दल मनीषा पोंगडे यांनी शाम यांचे आभार मानले. संदेश उर्फ शाम हे पाली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मागील दहा वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहेत.