“गाणारा पक्षी” कविवर्य अशोक बागवेंचा ठाणेकर करणार भव्य साहित्य गौरव

जनदूत टिम    19-Jan-2021
Total Views |

- 13 मार्चला ठाण्यात गौरव सोहळा
- समिती स्थापन

ठाणे : साक्षात यशवंत देवांनी ज्यांना गाणारा पक्षी म्हणून गौरवले ते ज्येष्ठ कवि प्रा. अशोक बागवे यांचा ठाणेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार अन् साहित्य गौरव होणार आहे.
 
ashok bagve025_1 &nb
 
वयाच्या सत्तरीचा योग साधून अनेक कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा सोहळा 13 मार्च रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के या सोहळ्याचे निमंत्रक आहेत. या सोहळयाच्या पूर्वतयारीनिमित्त काल ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकूल कॉलेजमध्ये 100 हून अधिक साहित्य, संस्था आणि नागरिकांची एक बैठक पार पडली. यात साहित्य गौरव समितीची स्थापना करण्यात आली.
 
या समितीत ठाणे, रायगड, पालघरातील अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. ‘आजतागायत अशोक बागवे’ या पुस्तकाचं या गौरव सोहळ्यात प्रकाशन होणार असून या निमित्ताने प्रतिभा आणि प्रतिमांच्या संगमाची साहित्य पर्वणी ठाणेकरांना मिळणार आहे.
पुन्हा शनिवार दि. 23 जानेवारी रोजी बैठक होणार असून ज्या संस्था, मंडळांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असं आवाहन या सोहळयाचे निमंत्रक महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे.