दत्तक घेतलेल्या गावात खासदार उदयनराजेंचा दारूण पराभव

जनदूत टिम    18-Jan-2021
Total Views |
राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

udayanraje_1  H 
 
या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने विजय मिळवला आहे. साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. या गावात उदयनराजे गटाने जोरदार प्रचार देखील केला होता. तरीही त्यांना यश प्राप्त करता येऊ शकलेलं नाही. कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ जागांपैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने १० जागांवर मुसंडी मारली आहे.