आजोबांच स्वप्न पूर्ण करणारा, वाघाच हृदय असणारा खरा हा 'नातू'

17 Jan 2021 13:56:01
मुंबई: हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल. आजोबांचं स्वप्न करणारा वाघाचं हृदय असलेला खरा नातू म्हणून त्यांचा गौरव करू, असंही ते म्हणाले.
आदित्य काय म्हणाले?

sudhir-bhau_1   
 
सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांचं भरभरून कौतुक केलं. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असं सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं.
 
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
Powered By Sangraha 9.0