चला पक्षी वाचवूया या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पक्ष्यांबद्दल आवड

भूषण सुतार    15-Jan-2021
Total Views |

पतंग उडवितांना नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पाली/गोमाशी : नायलॉन मांजामूळे होणारे दूष्परिणाम लक्षात घेऊन सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा कोंडी धनगरवाडी येथे बुधवारी (ता.१३) चला पक्षी वाचवूया" हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षक राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून पतंग उडवितांना नायलॉन मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. आणि चला पक्षी वाचवूयाचा व नायलॉन मांजा नको रे बाबा हा नारा दिला.
 
CHALA pAKSHI vACHUYAT_1&n
 
सर्वप्रथम राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थ्याना या विषयाचे महत्व व गांभीर्य लक्षात आणून दिले. मानवाच्या निष्काळजीपणामूळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होतील त्यामुळे पुढील पिढीला पक्षी हे चित्रातून दाखवावे लागतील.त्यांनतर विद्यार्थ्यांची गावात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यानी चला पक्षी वाचवूया, नायलॉन मांजा नको वापरायला, सुती मांजा द्या आम्हाला अशा घोषणा देत तसेच फलक दाखवत गाव दणाणून सोडले. विद्यार्थ्यानी नायलॉन मांज्याचे दुष्परिणाम सांगत उपस्थित पालक ग्रामस्थांचे प्रबोधन केले. सर्वांनी नायलॉन मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली.
 
मकरसंक्रांत या सणाचे औचित्य साधून अनेकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरल्यामुळे अनेक निष्पाप पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. या धारदार नायलॉन मांजामुळे अनेकवेळा माणसांना गभींर जखमा व प्रसंगी प्राणसुद्धा गमवावे लागतात. त्यामुळे सर्वत्र आशा स्वरूपाची जनजागृती होणे आवश्यक आहे. असे ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे यांनी सांगितले.
 
कायद्याचे पाठबळ
पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजासारखी धोकादायक वस्तूंची विक्री आणि साठवणूक करण्याची परवानगी देऊ नये. विक्री करणाऱ्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४४ नुसार कारवाई करावी असे पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेत नमूद आहे. याशिवाय भादंविच्या कलम १८८ अन्वयेसुद्धा कारवाई करुन पोलिस गुन्हा नोंदवू शकतात. विद्यार्थ्यामध्ये याबाबत जाणीवजागृती व्हावी हा विचार कोंडी धनगरवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र खैरे यांच्या मनात आला. त्याला विद्यार्थी व गावकरी यांनीही साथ दिली.
 
कोणताही सण हा आनंद घेऊन येत असतो. पण आनंद साजरा करतांना कळत - नकळत आपण पर्यावरणाची हानी व कोणाला इजा तर पोहोचवत नाही ना? याची दक्षता आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. विद्यार्थ्याचे बालमन हे अनुकरणशील व सुसंस्कारक्षम असते. त्यांच्यावर अशा उपक्रमांतून योग्य संस्कार झाल्यास भारताचे भावी सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक तयार होतील.
- राजेंद्र खैरे, उपक्रमशील शिक्षक