प्रजासत्ताकदिनी टमरेल आंदोलनाचा इशारां; शहापूर नगरपंचायतकडून हागणदारी मुक्ती अभियानाचा फज्जा

15 Jan 2021 17:41:40

- विहिरीत इमारत उभारली
- महिलांना शौचाला उघड्यावर बसायची वेळ
- बिल्डर पोसले जात आहेत; गरिबांना बेकायदेशीर ठरवले जात आहे

शहापूर : शहापूर नगरांचायतने हागणदारी मुक्ती योजनेचा फज्जा उडवला असून स्वार्थापोटी बिल्डर पोसण्याची कामे हाती घेतली आहेत. तावडेनगर शेजारील आदिवासी कातकरी वस्तीमधील महिलांना आजही उघड्यावर शौचाला बसावे लागत आहे.तालुक्याचा केंद्रबिंदू असलेली शहापूर नगरपंचायत या नामुष्कीकडे बेजबाबदारपणाने दुर्लक्ष करीत असून नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वतः च या नागरिकांना अनधीक्रुत वस्तीत घोषित करून मोकळे झाले.
 
hagan02556_1  H
 
या विटवेवाडी वस्तीत नगरपंचायतने कोणतेही शौचालय बांधले नसून अस्तित्वात असणाऱ्या विहिरिंवर सुद्धा बिल्डरांनी बांधकामे केलेली आहेत. भ्रष्ट कारभाराचे अंधत्व डोळ्यासमोर ठेऊन शहापूर नगरपंचायत या कातकरी महिलांवर अन्याय करीत असल्याची बाब व्रुशाली महिला सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा व्रुशाली पाटील यांनी उघडकीस आणून नगरपंचायतच्या कारभाराविरोधात २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी टमरेल आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
 
ग्राम स्वच्छता अभियानातून संपूर्ण गाव खेडी वस्त्या हागणदारी मुक्त झाल्या मात्र शहापूर नगर पंचायत मधील आमच्या तावडे नगर शेजारी असलेली आदिवासी कातकरी वस्ती मधील महिलांना शौचालय नसल्याने आजही उघड्यावर बसावे लागत आहे मात्र या बाबत महिलांनी नगर पंचायत कडे तक्रार करूनही काही कारवाई होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे.
 
hagan02556hagan0256874_1&
 
गेली अनेक पिढ्या हे आदिवासी येथे वास्तव्य करून राहत आहेत त्यांची जुनी घरे आहेत ती मोडकळीस अली आहेत घरपट्ट्या, आधारकार्ड रेशनकार्ड, तसेच ते नगर पंचायतीचे मतदार असल्याने यावेळी इथे नगरसेवक पदासाठी आदिवासी आरक्षण पडले आहे तरीही महिलांनी केलेल्या तक्रारींवर मुख्याधिकारी हे आदिवासी अतिक्रमण करून राहत असल्याचे म्हणत शौचालय बांधत नसल्याचे बेजबाबदार उत्तर देत आहेत म्हणजे स्वच्छता अभियान यांनी यशस्वी राबवले नाही याची कबुली देत शासनाला खोटा अवाहाल सादर केला आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी आहे. या वस्तीच्या नावे ठेकेदारी साठी अनेक रस्त्यांची अनेक कामे झाली त्याचा या वस्तीसाठी उपयोग नाही फक्त शौचालय बांधण्यासाठीच अधिकाऱ्यांना अडचण येत आहे का?
 
या लोकांसाठी पाण्याचीही सोय नाही , असलेल्या विहिरीवर बिल्डरने अतिक्रमण केले आहे, बोरिंग बंद आहे , त्यामुळे पाण्यासाठी वन वन भटकावे लागते या वस्तीच्या आजूबाजूला इमारती उभ्या राहिल्या मात्र या वस्तीत अत्यंत दुर्गंधी आहे घरांची पडझड झाली आहे अक्षरशः हे लोक उकिरड्यावर राहत आहेत आशा उपेक्षित वाडीतील महिलांसाठी शौचालय व पाणी यांची सोय करण्यात यावी यासाठी वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीने नगर पंचायतीस निवेदन देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0