कल्याण पच्छिमेतील अनंत रेजन्सी ते ठाणगेवाडी मार्गास राजमाता जिजामाता भोसले मार्ग असे नाव

14 Jan 2021 13:58:42
कल्याण : राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी नगरसेवक सचिन बासरे यांच्या प्रयत्नाने कल्याण पच्छिमेतील अनंत रेजन्सी ते ठाणगेवाडी मार्गास" राजमाता जिजामाता भोसले मार्ग" असे नाव कल्याण डोंबिवली महापालिके कडून मंजूर करण्यात आले आहे. त्याच नामफलकाचा नामकरण सोहळा १२ जानेवारी रोजी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने सुरेश केबल ऑफिस समोर आयोजित करण्यात आला होता.

kalayan548585_1 &nbs 
 
मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश फंड यांच्या अध्यक्षतेखाली फलक नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष रवींद्र कदम, शिवसेनेचे अरविंद मोरे, उल्केश पवार, चेतन म्हामुनकर, अमर कदम, प्रसाद दळवी, प्रतीक फंड, श्याम आवारे आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0