१५ जानेवारीला जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान

14 Jan 2021 13:52:59

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण १५८ आहे. त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण ९९६ मतदान केंद्रांवर दि. १५ जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
 
evm_1  H x W: 0
 
या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त्‍ न झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या ५ आहे. पुर्णत: बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या ८ आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जांगापैकी जांगासाठी वैध नामनिर्देशपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतीची संख्या २ आहे. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्राम पंचायतीची संख्या १४३ आहे.
 
एकुण जागांची संख्या १४७२ आहे. एकही वैद्य नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या ५९ आहे. माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैद्य नामनिर्देशनपत्र उरलेल्या बिनविरोध निवडणूक झालेल्या जांगाची संख्या ४१७ आहे.त्यापैकी १४३ ग्रामपंचायतीं मधील एकूण ९९६ मतदान केंद्रांवर दि. १५ जानेवारी २०२० रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
ठाणे पुरुष ५८२९ स्त्री ५१५९ आहेत.
 
कल्याण पुरुष मतदार-३११४७ व स्त्री मतदार २७१३७ व इतर १ आहे. अंबरनाथ पुरुष मतदार-२४४४९ व स्त्री मतदार- २२५६३ आहेत. भिवंडी पुरुष मतदार-६९०४० व स्त्री मतदार-६१८३१ व इतर १ आहे. मुरबाड पुरुष मतदार-२४५६२ व स्त्री मतदार-२२७२९ आहेत. शहापुर पुरुष मतदार-५४५३ व स्त्री मतदार-५०६१ आहेत. ग्रामपंचायतीची संख्या १५८ आहे. एकूण प्रभाग संख्या ५२६ आहे.सदस्य संख्या १४७२ आहे. पुरुष-१६०४८०, स्त्री-१४४४८०, इतर-२ एकूण मतदार ३०४९६२ आहे.
Powered By Sangraha 9.0