'परिसरात पक्षी मृत अवस्थेत अढळून आल्यास पशु संवर्धन विभागास कळविण्याची जनतेस आव्हान'

14 Jan 2021 16:11:22
माणगांव : देशातील बरऱ्याच् राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच अत्ता आपल्या राज्यातही या रोगाचे शिरकाव झाल्याचे पुष्टी झाल्याने खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू या रोगाचा संभाव्य/प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका निहाय दक्षता पथकाची नियुक्ती जिल्हा पशुसवर्धन उपायुक्त, रायगड मुक्काम अलिबाग मार्फत झाल्याचे माहिती प्रतिनिधीस सदर माणगांव पंचायत समिती पशुसंवर्धन विभागात येते सोमवार दि. ११ जानेवारी रोजी संपर्क साधले असता माहिती अवगत झाली आहे.
 
coco_1  H x W:
 
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती - माणगांव पशुधन विकास अधिकारी (विस्तार )तथा अतिरिक्त कार्यभार असलेल्या डॉ. एस. बी. शहा यानी प्रतिनिधीस अधिक माहिती देताना म्हणाले की समस्त जनतेस बर्ड फ्लू विषय बाबी माहिती अवगत व्हावी म्हणून तालुक्यात ठिकठिकाणी जसे विळेभागड, गोरेगाव, माणगांव पसुवैद्यकीय (प्राणी)दवाखान्यात राष्ट्रीय महामार्ग माणगांव शहर येते आणि माणगांव प.स. प्रवेश द्वारा जवळ बाहेर जनजागृतीचे बॅनर लावले आहे. तालुक्यात छोट्या मोठया अश्या सर्व मिळून ऐकून ७० ते ८० पोल्ट्री फार्म आहेत आपल्या तालुक्यात अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे पक्षी मृत अवस्थेत पडलेल्या कोणत्याही तक्रार आपला विभागस ना वनविभाग, कोणत्याही ग्रामपंचायत,पोल्ट्री धारक अगर जनतेकडून आलेली नाही. येत्या काही दिवसात पोल्ट्री धारक यांची एक बैठक बोलविणार आहे.
 
जनतेस आव्हान आहे की जरी एक तरी पक्षी जसे कावळे, चिमणी, कोंबडी.... ईतर पक्षी मृतावस्थेत दिसल्यास आमच्या विभागास तातडीने डॉ. दीपक खोत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, (तालपसचिव) पथक प्रमुख ९८२१३४४१९६, डॉ. शहा ९२७०२१७१२१ आणि डॉ. डी.बी. डुबल पशुधन विकास अधिकारी ९८२२७७९७०१ (सहाय्यक) या क्रमांकवर संपर्क साधावे, तसेच जनतेनी पोल्ट्री फार्म येथे जाऊनये. मात्र अंडी अगर चिकन ९० डिग्रीच्या वर शिजवून बिनधास्त खावे. सोबत मास्कचा वापर करावे, सोसियल डिस्टेंसिंग पाळावे. अंती डॉ. शहा यानी निदर्शनास आणून दिले की शेजारच्या जिल्यात दापोली येथे डम्पिंग ग्राउंड येते पाच कावले मृत अवस्थेत पडल्याचे घटना समोर आल्याने आपला तालुका सह जिल्यात जनतेनी सथर्क रहावे म्हणून कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0