आरमाईट महाविद्यालय आहे की भ्रष्ठाचाराचा अड्डा?

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |
शहापुर : कोटी विद्या चैरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन चालविन्यात येणाऱ्या अलमुरी रत्नमाला इंस्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, सापगाव, शहापुर, जिल्हा ठाणे महाविद्यालयाच्या संस्थाचालकांकडून होत असलेल्या आर्थिक गैरकारभार प्रकरणी जनता व पत्रकारमित्र यांच्यासाठी सविस्तर माहिती.
 
Shahapur_1  H x
 
कसा केला जातोय आरमाईटमधे आर्थिक भ्रष्टाचार?
- शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या खोट्या याद्या व त्यांचे खोटे पगार शुल्क नियमन समितीला दाखवून शुल्क नियमन समितीकडून मंजूर केले जाते.
- इंटर्नशिप च्या नावाखाली मुलांकड़ून पैसे उकळले जातात.
लाखों रुपये बस शुक्ल कैश स्वरुपात मुलांकडून घेतले जाते ,परंतु शासनाला असे सादर केले जाते की बस सुविधा महाविद्यालयाकड़ून मोफत दिली जाते.
- शिष्यवृत्तीचे व डिपॉजीट म्हणून घेतलेले पैसे महीनोंमहीने मुलांना दिले जात नाहीत.
- कोटी विद्या चैरिटेबल ट्रस्ट व कला श्री ट्रस्ट च्या नावाखाली साहित्य घेणे बंधनकारक करून प्रत्तेक विद्यार्थ्यांकडून हजारों रुपये उकळले जातात.
- शिक्षकांना दिलेले भले मोठे पगार त्यांच्याकडून पैसे कैश स्वरुपात परत घेवून संस्थाचालक अपहार करत आहेत.
- अवास्तव खर्च ,नसलेले खर्च शासनाला सादर केले जातात व भली मोठे शुल्क मंजूर केले जाते.
- खोटे ऑडिट रिपोर्ट सादर केले जातात.
- शिक्षकांच्या खोट्या सह्या मारून खोटे रिपोर्ट तयार केले जातात.
 
कोण करत आहे आरमाईटमधे भ्रष्ठाचार?
- संस्थाचालक श्री .अलामुरी व्यकन्टेश गुप्ता व श्री.लवेंद्र बोथरा यांच्याकडूनच ही भ्रष्ठ व्यवस्था राबवली जात आहे.
- महाविद्यालयात येणाऱ्या शासकीय कमिटीचे अधिकारी देखील पैसे घेवून मैनेज होताना दिसत आहेत.
- एवढा मोठा भ्रष्ठाचार एवढे वर्ष बेसुमारपणे संस्थाचालक करत आहेत याचा अर्थ अनेक मोठ्या शासकीय पदावरील अधिकारी व मोठे राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
कश्याप्रकारे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे?
- मुळात केवळ कागदोपत्री दाखवलेली मोठी कर्मचारी संख्या कमिटी विजिट व्यतिरिक्त कधीच उपस्थित नसते.
- जे शिक्षक उपस्थित असतात त्यांना नियमबाह्य पद्धतीने परिसरातील दहावी व बारावीच्या मुलांच्या घरी जावून प्रवेश करण्यासाठी पाठवले जाते.
- संस्थाचालकांचे नातेवाईक,मित्र परिवार यांच्या नावे केवळ कागदोपत्री वर्कलोड असतो परंतु त्या विषयांचे कधीही लेक्चर होत नाहीत. नावाला विजिटिंग म्हणून प्रायव्हेट क्लासेसचे सर बोलावून फॉरमैलिटी पूर्ण केली जाते.
- भ्रष्ठकारभारा विरुद्ध कोणी विद्यार्थी बोलले तर संस्थाचालक त्यांना नापास करण्याची धमकी देतात.
- प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांना कामावरुन काढण्यासाठी संस्थाचालक अतिशय खालच्या पातळीला जावून शिविगाळ करणे ,त्यांचे पंचिंग काढून टाकने,खोटे रेकॉर्ड तयार करून शिक्षकांना त्रास देणे असे प्रकार करतात.
- अपुरे इंफ्रास्ट्रक्चर असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. सगळे केवळ कागदोपत्री दाखवलेले आहे. प्रत्यक्ष सगळ्या व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.
- फैकल्टी एग्जामच्या नावाखाली नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर प्रामाणिक शिक्षकांची एग्जाम घेवून त्यांना त्रास दिला जातो.
- स्वतःच्या कुटुंबिय,जवळचे शिक्षक व नातेवाईक यांना एग्जाम ड्यूटी व बाकी डिपार्टमेंटची कसलीही कामे न देता त्यांच्या नावे केवळ पगार लाटले जातात.
- डिप्लोमा,डिग्री,एम एम एस अश्या सगळीकडे डमी फूल टाइम फैकल्टी दाखवलेले आहेत.
- संस्थाचालकांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ ,मुंबई विद्यापीठ,ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एजुकेशन दिल्ली, नैक ,एन बी ए,डायरेक्टर ऑफ टेक्निकल एजुकेशन यांना देखील वेगवेगळी माहिती दिली आहे. दिलेली माहीती व प्रत्यक्ष स्थिति यात देखील प्रचंड तफावत आहे.
- संस्थाचालक श्री गुप्ता यांचे महिला व मुलींसोबतचे वर्तन अतिशय अश्लील स्वरूपाचे असते. जेंव्हा येतील त्यावेळी शिविगाळ करूनच ते विद्यार्थिनी ,विद्यार्थी व कर्मचाऱ्यांशी बोलतात.
- प्रादेशिक भेदभाव देखील पाहायला मिळतो.
- काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नसेल तर सगळ्या विद्यार्थ्यांची यूनिट टेस्ट जानीवपूर्वक पुढे ढकलली जाते.
- सुट्टीच्या दिवशी जानीवपूर्वक टेस्ट घेण्याचे प्रकार घड़तात.
- पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने एग्जाम फॉर्म ,शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना चार चार दिवस वाया घालवावे लागतात.
- दाखले मिळवन्यासाठी,पावत्या मिळवन्यासाठी ठाणे हेड ऑफिस ला जाण्याचा आग्रह धरला जातो.
 
तक्रारदारांची दखल का घेतली जात नाही?
- तक्रारदारांवर सर्वप्रकारे दबाव आणला जातो.
- तक्रारदारांची खोटी बदनामी केली जाते.
- तक्रारदारांच्या घरी संस्थाचालक इतर कर्मचाऱ्यांना जबरदस्ती वारंवार पाठवून विषय मैनेज करतात.
- शासन दरबारी पाठपुरावा करण्यास लागणारा वेळ व पैसा सर्व सामान्यांना परवडत नाही.
- स्थानिक लोकांनी अश्लील वर्तन केले म्हणून चोप दिल्यानंतर देखील संस्था चालकांच्या वर्तवणुकित बदल होत नाही.
केंव्हापासून होत आहे आरमाईट मधे भ्रष्ठाचार?
- २००८ सालापासूनच आजअखेर संस्थाचालक आर्थिक, शैक्षणिक व व्यवस्थापन अश्या सर्व पातळीवर भ्रष्ठ व गैरकारभार करत आहेत.
- हिंदी भाषिक माइनॉरिटी कोटयामधे अनेकांचे खोटे प्रवेश करून कोट्यावधी रूपयांची माया डोनेशन मधून संस्थाचालकांनी कमावलेली आहे.
ईडी किंवा स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम ने संस्थाचालकांनी केलेला गैरप्रकाराची चौकशी करावी ही मागणी का?
- अतिशय सुनियोजितपणे ठाणे जिल्ह्यातील हजारों विद्यार्थ्यांची कोटयावधी रूपयांची लूट संस्थाचालकांनी केलेली आहे व अजूनही करत आहेत.
- बोगस शिक्षकांची यादी दाखवून शासनाची, विद्यार्थ्यांची अन् पालकांची फसवणूक केलेली आहे.
- अनेक राजकीय नेते ,शासकिय अधिकारी व जागा जमिनींचे व्यवहार करणाऱ्यांसोबत संस्थाचालकांचे हितसंबंध असल्याने प्रकरणं दाबली जातात.
- शिक्षकांचे पगार वेळेवर न करता मागील ४ वर्षे कसलीही पगारावाढ दिलेली नाही. तर अनेकांना मानसिक त्रास देवून कामावरून कमी केले आहे.
- संस्थाचालकांनी मागील काही वर्षातच समृद्धि हायवे जवळ व शहापुर तालुक्यात केलेल्या शेकडो एकर जागेची कोटयावधी रूपयांची खरेदी.
- संस्थाचालकांविरुद्ध जमीन व्यवहार प्रकरणात सुरु असलेले अनेक प्रलंबित प्रकरणे.
- विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केलेल्या तक्रारींची न घेतली गेलेली दखल.
- नैक व एन बी ए कमिटी यांची देखील संस्थेने केली प्रचंड फसवणूक.
वर दिलेली सर्व माहिती कश्याच्या आधारे सत्य आहे हे तपासले जाऊ शकते?
- अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वतः दिलेले अनेक पुरावे.
- माहितीच्या आधाराखाली शासनाकड़ून मिळालेल्या महितीच्या प्रति.
- शिक्षकांच्या ,कर्मचाऱ्यांच्या याद्या व त्यांचे प्रतिवर्ष दिलेले पगार
- शिक्षकांचे वेळापत्रक व विद्यार्थ्यांना दिलेले वेळापत्रक
-पेपर तपासणी व परीक्षा सुपरविझन च्या बाबतीतले २००८ पासून आजवरचे रेकॉर्ड
- सर्व कर्मचारी वर्गाचे पी एफ डिटेल्स.
- सर्व कर्मचारी वर्गाचे फॉर्म नंबर १६
- बैंक मधे जमा केलेली प्रत्तेक महिन्याच्या सैलरी डिटेल्स
- शिक्षकांचे हजेरीपत्रक व सत्यता
- शिक्षकांचे सर्विस बुक
-  गुप्ता यांना स्थानिक लोकांनी महाविद्यालयात चोपले होते त्या प्रकरणातील वायरल व्हिडीओ.
-विद्यार्थी,शिक्षक,मुक्ता शिक्षक संघटना, सीटू, व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी शासनाला केलेले पत्रव्यवहार.
- संस्थेने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुम्बई,मुंबई विद्यापीठ,शुल्क नियमन समिति, नैक, एन बी ए, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एजुकेशन महाराष्ट्र,ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एजुकेशन यांना शपथपत्रासह सादर केलेले सर्व प्रस्ताव.
-शासनाच्या वतीने आलेल्या सर्व कमिटी विजिटचे अवहाल.
- जमीनीच्या व्यवहारातील कागदपत्रे व न्यायालयात असलेली अनेक प्रलंबित प्रकरणे.
 
आरमाईट महाविद्यालयाच्या भ्रष्ठ कारभार प्रकरणी कोण कोणत्या सामाजिक व शिक्षक संघटना न्याय मागण्यासाठी पत्र व्यवहार करत प्रयत्नशील आहेत?
- मुक्ता शिक्षक संघटना,मुंबई विद्यापीठ
- सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अपर्णाताई खाडे
- सीटू च्यावतीने तालुका अध्यक्ष श्री.विजय विशे.
- मशाल या चैनलच्या वतीने श्री शरद पाटील.
 
संघटनांची प्रमुख मागणी काय?
- विद्यार्थ्यांची-पालकांची फसवणूक थांबवून दर्जेदार शिक्षण मिळावे.
-भ्रष्ठ संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत.
- संस्थेने शिक्षकांच्या मानवी हक्कांची व आर्थिक कुचम्बना करू नये.
- विद्यार्थ्यांच्याकडून व पालकांच्याकडून संस्थेने घेतलेले जादाचे शुल्क कायद्यानुसार परत करावे.