पडघा ग्रामपंचायतीमध्ये ३ कोटींच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार?

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |
पडघा : भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पडघा ग्राम पंचायतमध्ये निवडणुकीचा धुरळा उडत असतानाच भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी पडघा शहर अध्यक्ष यांनी दावा केलेल्या ३ कोटी चा पाणी योजनेचा आणि बोगस घरपट्टीचा घोटाळा मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
Padgha Grampanchayat_1&nb
 
पडघ्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी अंदाजे ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, परंतु राजकिय अनास्थेमुळे ६० लाखाचा निधी परत जाऊन उरलेल्या निधीतून ही योजना बोगस पाईप लावून पूर्ण करण्यात आली. सदर योजनेत फिल्टर प्लांट उभारला गेला नाही, त्यामुळे करोडोंचा निधी नेमका कोणाचा खिशात घातला गेला असा आरोप रणजित साळुंखे यांनी केला आहे, सदर भ्रष्टचारामुळे पडघ्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे चित्र पाहायला
मिळत आहे.
 
ग्रामपंचायतमध्ये बोगस घरपट्टी बुका द्वारे महसुलात चोरीचा रणजित साळुंखे यांचा आरोप
 पाणी योजनेचा भ्रष्टचारा सोबत रणजित साळुंखे यांनी घरपट्टी घोटाळा समोर आणून खळबळ उडवुन दिली आहे. पडघा ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी वसुली साठी २ पावती बुक वापरली जात असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे त्यातले एक बोगस असून त्याची कोणती ही नोंद नाही त्या पावती बुकातून जमा होत असलेली घरपट्टी ही कोणाच्या खिशात जाते तसेच त्यावर शिपायाची सह्या कशा काय असा प्रश्न त्यांनी विचारला असून खऱ्या बुकांची नोंद ठाणे जनता बँकेत होते मग ह्या बुकची नोंद कुठेच कशी नाही. इतका मोठ्या प्रमाणात घरपट्टी जमा होते ती कुठे जाते, आठवडी बाजारात जमा होत असलेल्या कराचा पैशांचे काय होते अशा अनेक आरोपांनी सध्या पडघ्यात खळबळ माजली असून, वरिष्ठ प्रशासन सदर आरोपांची काय दखल घेते या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.