फणसवाडी येथे सुरेशशेठ खैरे यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

12 Jan 2021 12:51:05
पाली/गोमाशी : सुधागडचा विकास हा केंद्र बिंदू मानून तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये शासनाच्या योजना त्यांच्या दारी आणून देण्याचे काम रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य तथा शेकापचे लोकनेते सुरेशशेठ खैरे करतात . त्यांच्या हस्ते फणसवाडी येथे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
 
pali02547_1  H
 
त्यावेळी फणसवाडी ग्रामस्थानकडून सुरेशशेठ खैर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गोमाशी ग्रामपंचायत सरपंच भूषण सुतार, ग्रामपंचायत सदस्या नंदिनी जाधव ,ठेकेदार आर सी पाटील ,माजी उपसरपंच शरद जंगम,केशव पार्टे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सुतार,फणसवाडी ग्रामस्थ अध्यक्ष हरी शिंदे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राजू कानडे,संतोष शिगरे, सुधीर शिंदे, अशोक चोरघे,राजेंद्र शिंदे,कृष्णकांत जाधव, निलेश शिगरे आदी ग्रामस्थ उपस्थिती होते.
Powered By Sangraha 9.0