आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन ठरत आहे जनतेसाठी - जनदुत

12 Jan 2021 12:16:53

पोलीस बांधवांसाठी एक अनोखा उपक्रम - जितेन्द्र पाटील

डोंबिवली : पोलीस आयुक्त ठाणे शहर. पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 अंतर्गत डोंबिवली पोलीस स्टेशन रामनगर ( पूर्व ) आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मीडटाऊन. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर पोलीस दिनाच्या ओचित्त साधून पोलीस कर्मचारी आणि इतर नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर डोंबिवली पोलिस स्टेशन रामनगर च्या आवारात नुकतेच पार पडले.
 
Rotery Club_1  
 
या आरोग्य तपासणी शिबिराचे प्रकल्प प्रमुख संजय पाटील, आणि आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील. त्यांनी काम पाहिले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मीड टाऊन अध्यक्ष कैलास सोनवणे व सेक्रेटरी अजय कुलकर्णी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अल्फा खोना. सचिव. मुक्ता जाधव.संपर्क प्रमुख. संजय तरे कार्याध्यक्ष.उमा डोळस यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन रोटरी आरोग्य केंद्र डोंबिवली पूर्व घरडा ट्रस्ट.आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. इशा नेत्रालय. आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल.यांनी संयुक्तरीत्या पोलीस कर्मचारी व इतर नागरिकांच्या विविध वैद्यकीय तपासणी करून त्यांना माहिती दिली व गरजेनुसार पुढील उपचार योजना बद्दल मार्गदर्शन दिले.
 
या आरोग्य तपासणी शिबिराच्या १०० हून अधिक पोलिस कर्मचारी व नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन डोंबिवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी खैरनार यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन चे सेक्रेटरी अजय कुलकर्णी. विष्णू सातवसे. विनोद बारी.राहूत जोगळेकर. जितेंद्र नेमाडे. अभय कुवळेकर. विकास डोके. अनिल हिरावत. डॉ. राज शेरे. व मानव सदस्य बापू वैद्य. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे कल्याण अनिता पावशे. नंदा मॅडम. अनिल तायडे. यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0