भाजपच्या ठाणे स्लम सेल अध्यक्षपदी कृष्णा भुजबळ

11 Jan 2021 17:39:28
ठाणे : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर स्लम (झोपडपट्टी) विभागाच्या अध्यक्षपदी कार्यकुशल कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली.भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन वसंतराव डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत नुकतेच भुजबळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले."स्लम सेल"अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तळागाळातील कार्यकर्त्यासह सर्व स्तरातून भुजबळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
bjp02_1  H x W:
 
ठाण्यात सत्ता नसली तरी,शहरातील बहुतांश विकासकामे व महात्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतुन केली जात आहेत.त्यामुळे,खऱ्या अर्थाने ठाणेकरांचा विकास भाजपच्या माध्यमातुनच होत आहे.आजघडीला ठाण्याचे क्षेत्रफळ १४४ चौ.मी. व लोकसंख्या साधारण २४ लाखाच्या घरात आहे.तरीही,बहुतांश जनता आजही झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहे.तेव्हा,केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातुन मुलभूत सुविधा व हक्काचे घरकुल देण्यासाठी तसेच, झोपडपट्टीवसियांच्या न्याय हक्कासाठीच्या लढयात कायम अग्रेसर राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.तसेच,येत्या काळात स्लम सेलच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे करण्याचा मानस भुजबळ यांनी बोलुन दाखवला.
Powered By Sangraha 9.0