माजी नगरसेविका रविना अमर माळी यांच्या पाठपुरव्याला यश

10 Jan 2021 22:44:27
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. डांबरीकरणाचे रस्तेही केले जात नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका निधीची कमतरता त्यामुळे रस्ते बनत नाही असे आरोप स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींकडून करुन देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट महापालिका बघत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात होता.
 
subhash bhoir02_1 &n
 
हे लक्षात घेता नगरसेविका रवीना अमर माळी यांनी माझी आमदार सुभाष भोईर यांच्या कडे पाठपुरावा केलेला. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून संदप गावातील पाण्याची टाकी मुख्य रस्ता ते माणिक पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संदप गावात करण्यात आले.
 
पाण्याच्या टाकिपासून माणिक पाटील यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर काही काळापासून रस्त्यामध्ये खड्डे असल्याचे चित्र होते. त्यामुळे संदप भागातील रहिवाश्यांना जाण्या येण्यास विविध त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे लक्षात घेता कार्यसम्राट नगरसेविका रवीना माळी यांनी पाठपुरावा करत रस्ते कामाचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ रविना अमर माळी, प्रसाद माळी , प्रकाश म्हात्रे, संतोष पाटील, किशोर गायकवाड, रमेश पाटील, सोमनाथ पाटील, तृप्ती पाटील, केशव पाटील, शिवदास पाटील, ज्ञानेश्वर मढवी संदप गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0