खा. सुनील तटकरे यांचा उपस्थितीत प्र.क्र. १५ येते रस्त्याच्या भूमी पूजन

10 Jan 2021 23:13:31
माणगांव : शनिवार दी. ०९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ठिक १२:०० वाजता माणगांव शहर येते वर्दळ असलेल्या आणि व्हीआयपी ठिकाणी म्हणून ओळखले जाणारे वार्ड क्र. १५ मधील पोस्ट ऑफिस क्षेत्र जवळ असलेल्या तीन अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रायगड लोकसभाचे खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार रितीने संपन्न झाला.
 
man145_1  H x W
 
या वेळी त्यांचा सोबत राजीपाचे माजी विरोधी पक्ष नेते राजीव अशोक साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा चिटणीस तथा तत्कालीन माणगांव ग्रामपंचायतचे सरपंच ज्येष्ठ नेते प्रभाकर उभारे,माजी नगराध्यक्षा आनंदशेत यादव,नगराध्यक्षा सौं. योगिता गणेश चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव (बबडी शेठ), सभापती, स्वच्छता व आरोग्य समितीचे रत्नाकर उभारे, सभापती हर्षदा स. सोंडकर (काळे),नगरपंचायत विरोधी नेते शिवसेनेचे सचिन मा. बोंबले,नगरसेविका भाग्यश्री आ.यादव, नगरसेवक संदीप खरंगटे, नितीन वाडवळ, नामनिर्देशित नगरसेवक नितीन बामगुडे होते.
 
खा. सुनील तटकरे यांचा आगमन होताच फाटाक्यांच्या आताषबाजीने आणि स्थानिक महिला यानी ओवाळणी करून त्यांचे आत्मीय स्वागत करण्यात आले.या समयी यशस्वी उद्द्योजक मारुतीशेठ बोंबले यानी खा. तटकरे यांना पुस्पगुछ देऊन हर्षुल्लसाने स्वागत केले. या नंतर उपस्थित मान्यवर जसे खा. तटकरे साहेब, प्रभाकर उभारे, ऍड. राजीवजी साबळे, मारुतीशेठ बोंबले, आनंदशेठ यादव, मोहम्मद शेठ धुंदवारे, नामदेव कासारे आणि स्थानिक नागरिक नंदकुमार जोशी या सर्वांनी श्रीफळ अर्पण केले.
या आनंदमयी कार्यक्रम साठी पोस्ट ऑफिसचा सर्व पदाधिकारी, कर्मचारी, पटेल हॉस्पिटलचे डॉ. जगदीश पटेल,स्थानिक प्रतिष्ठित नागरिक रायगड भूषण मानकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे तालुका उपाध्यक्ष श्री.नामदेव भाई कासारे, मनाली मनोज पोवार,उद्योजक सुनील दत्त चव्हाण, विजयफार्माचे मालक वेदपाठक, नंदकुमार जोशी, भरत आंबोणकर, विक्रांत देसाई आदी उपस्थित होते.
 
दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष अजित तार्लेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे सदस्य शैलेश बा. भोनकर,शहर अध्यक्ष मोहम्मशेत धुंद्वारे, महिला अध्यक्ष स्मिता मिरजकर, गणेश चव्हाण,कार्यकर्ते सचिन देसाई, तुळसा पवार, पालकर, गुगले आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0