जनावरांमध्ये आढळणारा विषाणू जन्य रोग -लम्पी स्कीन डिसीज

जनदूत टिम    09-Sep-2020
Total Views |
पालघर : महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सध्या जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला आहे. सदर रोग हा विषाणूजन्य साथीचा रोग असून लहान वासरांमध्ये याची अधिक तीव्रता दिसून येते. सदर आजार हा प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग ,म्हैस वर्गातील पशुधनास होऊ शकतो.
 
cow_1  H x W: 0
 
या विषाणूचे शेळ्या व मेंढ्या तील देवीच्या विषाणू शी साधर्म्य आढळून येते.मात्र हा रोग शेळ्या व मेंढ्यामध्ये आजीबात होत नाही. सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरामध्ये तीव्रता अधिक प्रमाणात आढळून येते.रोगामुळे मार्तुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित जनावरे अशक्त होतात. ह्या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधानापासून दुसऱ्या पशुधनाला डास ,चावणाऱ्या माश्या व गोचीड यांच्यामार्फत होतो. ह्या रोगाचा प्रसार दमट हवामानामध्ये जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतो.
 
प्रसार :
डास ,चावणाऱ्या माश्या, गोचीड यांच्या मार्फत होतो.
विषाणू चा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
विर्यामध्ये विषाणू येत असल्याने रोगाचा प्रसार कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतानातून होऊ शकतो.
 
लक्षणे :
बाधित जनावरांमध्ये सुप्त काळ हा 2 ते 5 आठवडे असतो.
ताप येणे,डोळ्यातून व नाकातून स्त्राव गळणे ,भूक मंदावणे,उत्पादकता क्षमता कमी होणे,गर्भपात होणे,प्रजनन क्षमता घटने इ. लक्षणे आढळून येतात.
ह्या आजारामध्ये जनावरांच्या पाठ,पाय,मान,पोट,शेपटी खालचा भाग ह्या ठिकाणी दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात.व त्यामध्ये काही दिवसानंतर पु सदृश्य स्त्राव पाहण्यास मिळतो.
तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी सदृश प्रकार आढळून येतो.
 
निदान :
रोगनिदाणासाठी त्वचेवरील वरणाच्या खपल्या ,रक्त व राक्त्ज्ल नमुने यांचा वापर करून रोगनिदान केले जाते.
 
नियंत्रण :
सद्यस्थिती मध्ये सदर रोगावर कुठल्याही प्रकारची प्रतिबंधक लस व औषधोपचार उपलब्ध नाही.
गोठ्यातील किटका साठी कीटकनाशकांची फवारणी करून गोठा निर्जंतुक करणे आवश्यक आहे.परिसरात पाणीसाठा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
बाधित जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे.
ज्या भागामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे अश्या भागातील पशुधनाची वाह्तुक व विक्री थांबविणे आवश्यक आहे.
जनावरांची तपासणी झाल्यावर कपडे ,फुटवेअर गरम पाण्यात धुवून निर्जंतुकीकरण करावे.
मागील शंभर वर्षाच्या इतिहासात हा रोग मनुष्यात प्रसारित झाल्याची कुठेही नोंद नाही त्यामुळे पशुपालकानी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यामुळे अश्या प्रकारची लक्षणे जर कोणत्या जनावरांमध्ये आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दावाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.