विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड

जनदूत टिम    08-Sep-2020
Total Views |
मुंबई : विधानपरिषद उपसभापतीची निवडणूक मंगळवारी पार पडली. यामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली. गोऱ्हे यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानपरिषदेत निवडीवेळी भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केल्याने नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली.
 
Nilima Gorhe_1  
 
विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीला भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रवीण पोटे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते मतदान करु शकत नाहीत, तसेच निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत. यामुळे भाजपने कोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायलायत याचिका दाखल केली आहे.