ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना करोनाची बाधा

जनदूत टिम    07-Sep-2020
Total Views |
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील मुलुंड या ठिकाणी असलेल्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
Vivek-Phansalkar_1 &
 
गेल्या तीन दिवसांपासून त्यांना कफ आणि ताप असे दोन त्रास जाणवत होते. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असंही रुग्णालयाने म्हटलं आहे.