आसनगाव शहरातील अनेक महिला आणि तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश

जनदूत टिम    07-Sep-2020
Total Views |
आसनगाव : आसनगावमधील पाणी, रस्ते, गटारी व इतर अनेक समस्यांना कंटाळून आज अनेक महिला व तरुणांनी श्री राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षावर विश्वास ठेवत आज मनसेत जाहीर प्रवेश केला.
 
MNS_1  H x W: 0
 
जिल्हा संघटक श्री मदन पाटील आणि तालुकाध्यक्ष श्री जयवंत मांजे यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसे आसनगाव शहर अध्यक्ष  अविनाश चंदे यांच्या नेतृत्वाखाली, मनसे महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. नयना भोईर मॅडम यांच्या हस्ते या महिलांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी वनिता निचिते यांची आसनगाव मनसे महिला शहर अध्यक्ष पदी आणि सौ. तृप्ती माळी यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तर श्री रविकांत बोंबे यांची मनसे आसनगाव शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
 
या प्रवेशासाठी मनसे चे सर्व जिल्हा, तालुका, शहापूर शहर व आसनगाव शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते. या प्रवेशाने आसनगाव शहरात मनसे ची ताकद निश्चितच वाढल्या चे दिसून आले.